ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध सिडनी येथे खेळताना फिलिप ह्यूज याची आठवण काढली. जेव्हा तो मैदानात फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला त्याचा दिवंगत मित्र फिलिप ह्यूजची आठवण झाली. याच मैदानावर शेफिल्ड शिल्डच्या सामन्यादरम्यान डोक्याला चेंडू लागल्याने ह्यूजचा मृत्यू झाला होता. मैदानात उतरण्यापूर्वी सहकारी सलामीवीर उस्मान ख्वाजा यानेही त्याला मिठी मारली.
2014 मध्ये सिडनी क्रिकेट ग्राउंडवर एका देशांतर्गत सामन्यादरम्यान फिलिप ह्यूज ( Philip Hughes) याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यावेळी डेव्हिड वॉर्नर (David Warner) दुसऱ्या बाजूला फलंदाजी करत होता. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये जीवाशी झुंज दिल्यानंतर 27 नोव्हेंबरला फिलिप ह्यूजचा मृत्यू झाला होता.
David Warner never forgets Phil Hughes. 🫡
– For one last time in Test cricket. pic.twitter.com/IRFDKLxa2v
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2024
पाकिस्तानी खेळाडूंनीही डेव्हिड वॉर्नर याला मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन त्याचा गौरव केला. यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डेव्हिड वॉर्नरने ही मालिका सुरू होण्यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. सिडनी कसोटीपूर्वी त्याने एकदिवसीय क्रिकेटलाही अलविदा केला. परंतु, ऑस्ट्रेलिया संघाला त्याची गरज भासल्यास तो 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी उपलब्ध असेल असेही त्याने सांगितले.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 313 धावा केल्या. मोहम्मद रिझवान, सलमान आगा आणि आमेर जमाल यांनी अर्धशतके केली. एक काळ असा होता की, पाकिस्तान संघ 4 विकेट्स गमावून 47 धावांवर होता, त्यावेळी मोहम्मद रिझवानने अर्धशतकीय खेळी केली आणि धावसंख्या 300 च्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (AUS vs PAK: David Warner gets emotional remembering friend Philip Hughes in last Test match of his career)
हेही वाचा
फू बाई फू! शुबमन गील-विराट कोहलीने चालू सामन्यातच खेळली फुगडी, व्हिडीओ व्हायरल
IND vs SA । केपटाऊन कसोटीचा पहिला दिवस ठरला असाधारण! 27 फलंदाजांची खेळपट्टीवर हजेरी