मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ५८ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ८ विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीकडून मिशेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांनी अर्धशतक पूर्ण करत विजयात मोलाचे योगदान दिले. दरम्यान, याच सामन्यात एकाच षटकात वॉर्नरला जवळपास तीनवेळा जीवदान मिळाले.
वॉर्नरला तीनवेळा जीवनदान
या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर (Rajasthan Royals vs Delhi Capitals) १६१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून मिशेल मार्श (Mitchell Marsh) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) फलंदाजी करत असताना ९ वे षटकात राजस्थानकडून युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) गोलंदाजी करत होता. याच षटकात वॉर्नरला अनेकदा जीवदान मिळाले.
या षटकातील दुसऱ्या चेंडूवर वॉर्नरने डीप स्क्वेअर लेगला फटका मारला होता, जो चेंडू षटकारासाठी गेला. पण या चेंडूवर वॉर्नर झेलबादही होऊ शकला असता. कारण क्षेत्ररक्षण करत असलेल्या देवदत्त पडीक्कलने उडी मारून चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो चेंडूपर्यंत पोहचला नाही. या चेंडूवर वॉर्नरकडून फटका मारताना थोडी चूक झाली होती. पण तरी चेंडू षटकारासाठी गेला.
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर वॉर्नरने पुन्हा मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण यावेळीही चेंडू त्याच्या बॅटवर नीट आला नाही. पण, चेंडू लाँग ऑफच्या दिशेने गेला. त्यावेळी जोस बटलर चेंडूपर्यंत पोहचला, पण त्याच्याकडून हा झेल सुटला आणि वॉर्नरला जीवदान मिळाले. यावेळी वॉर्नर १९ धावांवर खेळत होता.
यानंतरही वॉर्नरला ९ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवरही जीवदान मिळाले. या चेंडूवर चहलने वॉर्नरला चकवले होते. पण यावेळी चेंडू स्टंपला घासून मागे गेला. यावेळी स्टंप्सच्या लाईट्सही लागल्या, पण बेल्स खाली पडल्या नाहीत. ज्यामुळे वॉर्नरला बाद देता आले नाही.
https://twitter.com/patidarfan/status/1524449998242390016
वॉर्नरची मार्शबरोबर शानदार भागीदारी
या जीवदानाचा वॉर्नरने नंतर चांगला फायदा घेत ५ चौकार आणि १ षटकारासह ४१ चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी केली. तसेच त्याने मिशेल मार्शबरोबर १४४ धावांची दमदार भागीदारी करत दिल्लीला १८.१ षटकातच विजय मिळवून दिला. मार्शने ६२ चेंडूत ५ चौकार आणि ७ षटकारांसह ८९ धावांची खेळी केली. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी, राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६० धावा केल्या. राजस्थानकडून आर अश्विनने (R Ashwin) ३८ चेंडूत ५० धावांची खेळी केली. त्याला देवदत्त पडीक्कलने चांगली साथ दिली. पडीक्कलने ३० चेंडूत ४८ धावा केल्या. दिल्लीकडून चेतन साकारिया, एन्रीच नॉर्किया आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
वॉर्नरची आयपीएलमधील ‘या’ विक्रमात विराट, शिखरशी बरोबरी, आता केवळ रैना आहे पुढे
आयपीएल २०२२ मध्ये ५८ सामन्यांत झालीये ८०० पेक्षाही जास्त षटकारांची बरसात, ‘हा’ संघ अव्वलस्थानी
आयपीएल २०२२ संपताच ‘हा’ दिग्गज सोडणार केकेआरची साथ, ज्याने पहिल्याच सामन्याला बनवलेले अविस्मरणीय