---Advertisement---

वॉर्नरच्या संघासाठी निराशाजनक ठरली आयपीएल 2023, पण कर्णधाराने विराटला पछाडत नावावर केला मोठा विक्रम

On: रविवार, मे 21, 2023 12:03 AM
David Warner
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रदर्शन खूपच सुमार राहिले. शनिवारी (20 मे) दिल्लीला हरवून चेन्नई सुपर किंग्ज संघ प्लेऑफमध्ये पोहोचला. सीएसकेने हा सामना 77 धावांनी जिंकला आणि गुजरातनंतर प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघही ठरला. दिल्लीसाठी यावर्षीचा हंगाम निराशाजनक राहिला आसला, तरी कर्णधार डेविड वॉर्नर याने मात्र सीएसकेविरुद्धच्या सामन्यात मोठा विक्रम नावावर केला.

दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात दुखापतग्रस्त झाला. कार अपघातात पंतला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला मैदानात पुनरागमन करण्यासाठी अजून बराच काळ लागणार आहे. पंतच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नर (David Warner) याला पुन्हा आयपीएल संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, पण यावर त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. वॉर्नरच्या नेतृत्वातील दिल्ली कॅपिटल्सने लीग स्टेजमधील शेवटचा सामना शनिवारी सीएसकेविरुद्ध 77 धावांनी गमावला. हंगामातील 14 पैकी 9 सामन्यांमध्ये दिल्लीच्या हाती निराशा आली आहे, तर 5 सामन्यांत त्यांना यश मिळाले आहे.

हंगामात दिल्लीचे प्रदर्शन निराशाजनक असले, तरी कर्णधार वॉर्नरने मोठा विक्रम केला. वॉर्नरने यावर्षी 14 आयपीएल सामन्यात 36.85च्या सरासरीने 516 धावा केल्या आहेत. सोबतच आयपीएलमध्ये सर्वाधिक हंगामात 500 पेक्षा अधिक दावा करण्याचा विक्रम त्याने नावावर केला. हा त्याचा सातवा आयपीएल हंगाम आहे, ज्यामध्ये 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

आयपीएल 2014, 2015, 2016, 2017, 2019, 2020 आणि आता 2023मध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा विक्रमही वॉर्नरकडून मोडीत निघाला. पूर्वी विराट कोहली (Virat Kohli) आणि वॉर्नर यांनी प्रत्येकी 6 आयपीएल हंगामांमध्ये 500धावा केल्या होत्या. पण शनिवारी वॉर्नर विराटच्या पुढे गेला. यादीत केएल राहुल आणि शिखर धवन अनुक्रमे तीन आणि चार क्रमांकावर आहेत. (David Warner has become the batsman to score 500+ runs in most IPL seasons)

सर्वाधिक आयपीएल हंगामांमध्ये 500+ धावा करणारे खेळाडू
डेविड वॉर्नर – 7 (2014, 2015, 2016, 2017, 2019, 2020, 2023)
विराट कोहली – 6 (2011, 2013, 2015, 2016, 2018, 2023)
केएल राहुल – 5 (2018, 2019, 2020, 2021, 2022)
शिखर धवन – 5 (2012, 2016, 2019, 2020, 2021)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या फिटनेसविषयी सीएसके प्रशिक्षकाची मोठी माहिती, कर्णधार धावण्यासाठी करतोय संघर्ष
 बझबॉलच्या जोरावर इंग्लंड ऍशेस जिंकणार? ऑस्ट्रेलियन संघाला अँडरनसचे खुले आव्हान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---