---Advertisement---

बझबॉलच्या जोरावर इंग्लंड ऍशेस जिंकणार? ऑस्ट्रेलियन संघाला अँडरनसचे खुले आव्हान

James Anderson
---Advertisement---

जागतिक क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख असलेली ऍशेस मालिका पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना संपल्यानंतर काहीच दिवसांमध्ये ऍशेस मालिका सुरू होईल. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन देखील ऍशेसपूर्वी फिट होईल असे सांगितले जात आहे. अँडरसनच्या मते इंग्लंडला आपल्या बझबॉल शैलीचा फायदा आगामी ऍशेसमध्ये मिळेल आणि संघ ऑस्ट्रेलियाला मात देईल.

ऍशेस मालिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोन देशांमध्ये खेळली जात असली, तरी त्याचे चाहते जगभरात आहेत. ऍशेसम 2022 मध्ये इंग्लंडचा ऑस्ट्रेलियन संघाकडून दारून पराभव झाला होता. पण यावेळी इंग्लंड संघ ऑस्ट्रेलियावर भारी पडेल, असे मत जेम्स अँडरसन (James Anderson) याने व्यक्त केले. ऍशेस 2023ची सुरुवात 16 जुनपासून होणार आहे. मालिका सुरू होण्याआधीच दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाले आहेत. अशातच अँडसनची प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. अँडरसनला काउंटी क्रिकेटमध्ये लंकाशायरसाठी खेळताना दुखापत झाली होती. सध्या तो दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे आणि ऍशेससाठी फिट होण्याची पूर्ण शक्यता आहे.

अँडरसनच्या कारकिर्दीतील ही 10वी ऍशेस मालिका आहे, जी त्याच्यासाठी खरोकर खास ठरू शकते. यावर्षी इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऍशेसविषयी अँडरनस म्हणाला, “मला विश्वास आहे इंग्लंड 2015 नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा बदला घेऊ शकते. खासकरून बझबॉलचा मदतीने आम्ही विजय मिळवू शकतो. हीच शैली वापरून आमचा कर्णधार बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांनी 12 पैकी 10 कसोटी सामने जिंकले आहेत. तुम्ही आमचा संघ पाहा, जर सर्वांनी विजयाच्या मानसिकतेसह सर्वोत्तम खेळ केला, तर मला वाटत नाही की, दुसरा कुठलाच संघ आमचा सामना करू शकेल. यामुळेच आम्ही यावर्षी जिंकू शकतो, असे मला वाटते.”

दरम्यान, मागच्या वर्षी इंग्लंडचा बन स्टोक्स आणि ब्रँडन मॅक्युलम ही कर्णधार प्रशिक्षकाची नवीन जोडी लाभली. या दोघांनी संघाची धुरा हातात घेतल्यापासून इंग्लंड संघ कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक खेळ करताना दिसला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये हा नवीन प्रयोग असला, तरी इंग्लंड संघाला याचा फायदाच झाला आहे. असात आगामी ऍशेस मालिकेत देखील इंग्लंडला आपल्या बझबॉल शैलीचा फायदा होऊ शकतो. (Will England win the Ashes on the strength of Buzzball? Andersen’s open challenge to the Australian team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा रंगला धोनी-मॉरीसनमध्ये मजेदार कलगीतुरा, पाहा धोनीचा हजरजबाबीपणा
धोनीसाठी रस्त्यावर उतरली दिल्ली! अखेरच्या सामन्याआधी सीएसकेची बस रोखली, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---