---Advertisement---

नाद नाद नादच! डेविड वॉर्नरने शंभराव्या कसोटीत झळकावली डबल सेंच्युरी, भीम पराक्रम केला नावावर

On: मंगळवार, डिसेंबर 27, 2022 11:41 AM
David-Warner
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात उभय संघात 3 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.  कसोटी मालिकेतील दुसरा सामना सोमवारपासून (दि. 26 डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक खेळाडू डेविड वॉर्नर याने शानदार द्विशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, हा वॉर्नरचा 100वा कसोटी सामना आहे. या द्विशतकासह वॉर्नरच्या नावावर खास विक्रमाची नोंदही झाली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला खास कामगिरी करता आली नाही. त्यांचा डाव 68.4 षटकात 189 धावांवर संपुष्टात आला. यावेळी फक्त दोन फलंदाजांना अर्धशतक झळकावण्यात यश आले. त्यात मार्को यान्सेन (59) आणि काइल व्हेरेने (52) यांचा समावेश होता.

वॉर्नरचा विक्रम
यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाकडून फलंदाजी करताना दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात डेविड वॉर्नर (David Warner) याने 254 चेंडूंचा सामना करत 200 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 16 चौकारही मारले. विशेष म्हणजे, द्विशतक करत वॉर्नरने भीम पराक्रम त्याच्या नावावर केला.

वॉर्नर शंभरावा कसोटी सामना करताना द्विशतक झळकावणारा दुसरा खेळाडू बनला. त्यापूर्वी असा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) याने केला होता. जो रूट याने 2021मध्ये भारतीय संघाविरुद्ध खेळताना द्विशतक झळकावले होते. त्याने भारताविरुद्ध 218 धावांची द्विशतकी खेळी साकारली होती.

ऑस्ट्रेलियाचा डाव
द्विशतक झळकावल्यानंतर वॉर्नर रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. वॉर्नर मैदानाबाहेर गेला तेव्हा ऑस्ट्रेलिया संघ 77 षटकांनंतर 3 विकेट्स गमावत 329 धावांवर खेळत होता. वॉर्नरनंतर कॅमरून ग्रीन हा मैदानावर फलंदाजीला आला. मात्र, तोदेखील 6 धावा केल्यानंतर रिटायर्ड हर्ट झाला. सध्या ऑस्ट्रेलिया संघ 85 षटकांनंतर 3 विकेट्स गमावत 365 धावांवर खेळत आहे. यावेळी ट्रेविस हेड (35) आणि ऍलेक्स कॅरे (0) खेळपट्टीवर कायम आहेत. (David Warner hit double century in the 100th test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 लिलावात 17.50 कोटी मिळवणाऱ्या खेळाडूचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला, ‘प्रामाणिकपणे सांगतो…’
‘भावा काहीतरी कर, पप्पी- किस घे…’, मोहम्मद कैफचा पुजाराला अजब सल्ला; मॅचविनरही खळखळून हसला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---