---Advertisement---

Video: वॉर्नरने ओळखलीय भारतीय चाहत्यांची नस? ‘पुष्पा’ सिनेमातील हुक स्टेप करत जिंकली लाखो मने

On: रविवार, एप्रिल 10, 2022 3:30 PM
David-Warner-Pushpa-Style-Video
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२चा चौथा डबल हेडर रविवारी (१० एप्रिल) झाला. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत झाली. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेला हा सामना अतिशय रोमांचक राहिला. कारण या सामन्यात दिल्ली संघाचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर आणि आजी कर्णधार रिषभ पंत आमने सामने होते. दरम्यान या सामन्यापूर्वी दिल्ली संघाकडून त्यांचा सलामीवीर डेविड वॉर्नर याने भारतीय चाहत्यांची मने जिंकणारे कृत्य केले आहे.

वॉर्नर (David Warner) त्याच्या मैदानावरील फटकेबाजीबरोबरच त्याच्या मस्तमौला स्वभावासाठी ओळखला जातो. त्यातही त्याच्यावर भारतातील दाक्षिणात्य सिनेमांचा खूप प्रभाव आहे. त्यामुळे बऱ्याचदा तो गाजलेल्या दाक्षिणात्य सिनेमांतील गाण्यांवर रिल्स बनवताना दिसला आहे. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर कोलकाताविरुद्धच्या (DC vs KKR) लढतीपूर्वी सर्व खेळाडू टीम बसने हॉटेलमधून स्टेडियमकडे जात असताना वॉर्नरने असेच काही करत भारतीय चाहत्यांनी (Indian Fans) मने जिंकली आहेत.

दिल्ली संघाने त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओत दिसते की, दिल्लीचे एकामागून एक सर्व खेळाडू टीम बसमध्ये चढत होते. या सर्व क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेटरसिंकानी टीम बसच्या बाहेर गर्दी केली आहे. यादरम्यान वॉर्नर बसमध्ये चढत असताना सर्व चाहते मोठमोठ्याने ओरडू लागतात.

यावर वॉर्नर सध्या भरपूर चर्चा झालेल्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील दाढीवरून हात फिरवण्याची हुक स्टेप (Pushpa Hook Step) करत चाहत्यांना प्रतिसाद देतो. यावर चाहते अजून जास्त खुश होतात (David Warner Impresses Indian Fans) आणि ओरडू लागतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

https://www.instagram.com/tv/CXVv7sbJU1X/?utm_source=ig_web_copy_link

वॉर्नरने पुष्पा चित्रपटातील गाण्यांवर यापूर्वीही बरेच व्हिडिओ बनवले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले होते.  तो ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘आय बिद्दा ईधी ना अड्डा’ या नवीन गाण्यात फिल्मस्टार अल्लू अर्जुनच्या जागी स्वतःचा चेहरा लाऊन डान्स करताना दिसत होता.

असे आहेत ११ जणांचे संघ
कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, सर्फराज खान, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद

महत्त्वाच्या बातम्या-

KKR vs DC: कोलकाताचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; दिल्लीने दिग्गज गोलंदाजाला केले प्लेइंग ११ मधून बाहेर

वडिल सायकलपटू, पण मुलगा बनला क्रिकेटर; आता थेट मुंबई इंडियन्सकडून केले आयपीएल पदार्पण

थर्ड अंपायरच्या निर्णयावर विराट कोहलीची आगपाखड, मैदानातून बाहेर जाताना रागाच्या भरात आपटली बॅट; पाहा रिऍक्शन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---