नुकताच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार विजय मिळवत १-० ची आघाडी घेतली आहे. याच संघाचे प्रतिनिधित्व करणारा डेविड वॉर्नर सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतो. तो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर मजेशीर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. नुकताच त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
डेविड वॉर्नरचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. तसेच टीकटॉक या ॲपवर देखील तो ॲक्टीव्ह असतो. शनिवारी (११ डिसेंबर) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो अल्लू अर्जुनच्या नवीन चित्रपटातील ‘पुष्पा द राइज’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. यादरम्यान त्याने फेस स्वॅपचा वापर केला आहे. ज्यामध्ये त्याने अल्लू अर्जुनच्या जागी स्वतःचा चेहरा लावला आहे.
इंग्लंड संघाविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘आय बिद्दा ईधी ना अड्डा’ या नवीन गाण्यात फिल्मस्टार अल्लू अर्जुनच्या जागी स्वतःचा चेहरा लाऊन डान्स करताना दिसत आहे. डेविड वॉर्नर हा दाक्षिणात्य चित्रपटांचा खूप मोठा चाहता आहे. यापूर्वी देखील त्याने असे व्हिडिओ शेअर केले आहेत.
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने देखील या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की, “मित्रा, तू ठीक तर आहेस ना?” सर्वांना माहीत आहे की, तो डेविड वॉर्नरची पायखेची करत होता. त्यामुळे डेविड वॉर्नरने देखील मजेशीर उत्तर दिले की “थोडं दुखतंय. पण मला माहीत आहे की तू माझ्या मनाबद्दल विचारत आहेस, ते कधीच बरं होत नाही.”
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ १६ लाख लोकांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
विश्वचषक जिंकून देण्यात युवराजची भूमिका सर्वात महत्त्वाची; पाहा आकडे काय सांगतात?
‘एव्हरयंग’ ताहिर श्रीलंकेत करतोय मन जिंकणार काम; स्वत: केला खुलासा
“२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यानंतर विराट खचलेला”; माजी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा