---Advertisement---

“त्याला खूप दु:ख झालंय…”, रिंकू सिंहच्या वडिलांनी व्यक्त केल्या भावना; टी20 विश्वचषकात संधी न मिळाल्यानं कुटुंबीय निराश

---Advertisement---

स्फोटक फलंदाज रिंकू सिंहला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. रिंकूची निवड न झाल्यानं केवळ चाहतेच नाही तर अनेक क्रिकेट तज्ज्ञही हैराण झाले आहेत. त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आलं असलं तरी त्याचे वडील खानचंद्र सिंह यांना रिंकूची मुख्य संघात निवड होईल अशी आशा होती. खानचंद्र सिंह म्हणाले की, त्याचं कुटुंबं फटाके फोडण्याच्या तयारीत होतं. मात्र संघाची माहिती मिळताच सर्वांची निराशा झाली.

एका मुलाखतीत रिंकू सिंहच्या वडिलांनी सांगितलं की, “आम्हाला खूप अपेक्षा होत्या आणि त्यामुळेच थोडं दु:ख आहे. आम्ही मिठाई आणि फटाकेही आणले होते. आम्ही रिंकू प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल असा विचार करत होतो. त्याचं मनही दु:खी झालं आहे. त्यानं आईशी बोलून सांगितलं की त्याचं नाव 11 किंवा 15 खेळाडूंमध्ये नाही, परंतु तो संघासोबत जात आहे.”

भारताच्या टी20 विश्वचषक संघात रिंकू सिंहची निवड न झाल्यानं चाहते निराश झाले आहेत. याला कारण म्हणजे, 2023 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केल्यानंतर, रिंकूनं 15 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 89 ची सरासरी आणि 176च्या स्ट्राईक रेटनं 356 धावा केल्या आहेत.

गेल्या एका वर्षापासून रिंकू सिंह पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे. गेल्या वर्षी त्यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतील 2 सामन्यांत 82 धावा केल्या होत्या, ज्यात 68 धावांची झंझावाती खेळी देखील समाविष्ट होती. त्याआधी त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 डावात 52.5 च्या उत्कृष्ट सरासरीनं 105 धावा केल्या होत्या.

भारतासाठी खेळताना एवढे उत्कृष्ट आकडे असूनही रिंकूला विश्वचषकाच्या टीममध्ये स्थान न मिळाल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. रिंकूसह शुबमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांना टी-20 विश्वचषक 2024 साठी राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

रिंकू सिंह ठरला ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमाचा बळी? वर्ल्ड कपच्या टीममध्ये स्थान न मिळण्याला केकेआरचं मॅनेजमेंट जबाबदार?

“मुंबई इंडियन्सचा ‘हा’ फलंदाज टीम इंडियाचं भविष्य आहे”, लखनऊविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याचं भाकीत

आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे टीम इंडियाची निवड? स्पर्धेत ठसा उमटवणाऱ्या ‘या’ 5 खेळाडूंची लागली लॉटरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---