आयपीएल 2024 च्या 49व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्ज समोर पंजाब किंग्जचं आव्हान आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
पंजाबचा कर्णधार सॅम करन – आम्ही प्रथम गोलंदाजी करू. नवीन विकेट दिसते. शेवटच्या सामन्यानंतर आम्ही उत्साहित आहोत. आम्हाला चांगली सुरुवात करावी लागेल आणि लवकर विकेट्स घ्याव्या लागतील. चेन्नईची टीम चांगली आहे. आम्हाला धैर्य ठेवावं लागेल. आमच्या संघात बदल नाही.
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड – येथे भरपूर दव असताना आम्ही 78 धावांनी जिंकलो हे बरंच काही दर्शवतं. आम्हाला आज चांगला स्कोअर करावा लागेल. प्रत्येक खेळ महत्त्वाचा असतो. पाथीराना जखमी आहे. देशपांडेची तब्येत बरी नाही. त्याच्याजागी शार्दुल आणि रिचर्ड ग्लीसन आले आहेत
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पंजाब किंग्ज – जॉनी बेअरस्टो, सॅम करन (कर्णधार), रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग
इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन, विद्वत कवेरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया
चेन्नई सुपर किंग्ज – अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन, मुस्तफिजुर रहमान
इम्पॅक्ट प्लेअर्स – समीर रिझवी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, प्रशांत सोळंक
चालू हंगामात चेन्नई आणि पंजाब प्रथमच आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघ शेवटचा सामना जिंकून या सामन्यात उतरणार आहेत. गेल्या सामन्यात चेन्नईनं सनरायझर्स हैदराबादचा 78 धावांनी दारूण पराभव केला होता. तर पंजाब किंग्जनं कोलकातावर 8 गडी राखून विजय मिळवला. कोलकाताविरुद्ध जॉनी बेअरस्टोच्या शतकाच्या जोरावर पंजाबनं 262 धावांच्या ऐतिहासिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईनं आतापर्यंत 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जनं 9 पैकी फक्त 3 सामने जिंकले असून ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवनच्या अनुपस्थितीत अष्टपैलू सॅम करन संघाची जबाबदारी सांभाळतोय. धवननं शेवटचा सामना 14 एप्रिल रोजी हैदराबादविरुद्ध खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
मयंक यादव पुन्हा जखमी झाल्यानं संतापला ब्रेट ली, लखनऊच्या मॅनेजमेंटला धरलं जबाबदार