दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी लेगस्पिनर (South Africa) इम्रान ताहिर (Imran Tahir) त्याच्या लेग स्पिन गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने जगातल्या भरपूर टी२० लीगमध्ये खेळून उत्कृष्ट प्रदर्शन केलंय. सध्या सुरु असलेल्या लंका प्रीमियर लीगमध्ये (Lanka Premier League) तो खेळत आहे. त्याने क्रिकेटच्या त्याच्या ज्ञानाबद्दल एक प्रतिक्रिया दिली. ताहिर म्हणाला त्याला तरुण खेळाडूंसोबत त्याचं ज्ञान वाटायला खूप आवडतं.
ताहिर म्हणतो की, “त्याला त्याचं ज्ञान तरुण खेळाडूंसोबत वाटल्यावर खूप आनंद होतो. जर ते मला येऊन विचारतात तर माझं कर्तव्य आहे की मी ते ज्ञान त्यांना द्यावे.” लंका प्रीमियर लीग आपले कौशल्य दाखवण्यासाठी उत्कृष्ट असा रंगमंच आहे. वनिंदु हसरंगा (Wanindu Hasranga) आता जगभरातल्या लीगसाठी आवडता खेळाडू बनला आहे.
ताहिर हे पण म्हणाला की, “तरुण खेळाडूंनी शिकलं पाहिजे की टी-२० क्रिकेटमध्ये कसं यश प्राप्त करता येईल. मला काही चांगले ऑफ स्पिन गोलंदाज मिळाले आहेत आणि ते उत्कृष्ट गोलंदाजी करतात. मी त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करतोय.”
ताहिर आयपीएलमध्ये (IPL) सुद्धा बऱ्याच वेळेपासून खेळत आहेत. चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) खेळताना त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे. लंका प्रीमियर लीगमध्ये काही चांगले खेळाडू खेळत आहेत आणि त्यांना ताहिरच्या अनुभवाचा खूप फायदा होईल. ताहिर डम्बुला जायंट्सकडून (Dambulla Giants) खेळत आहे.
टी२० क्रिकेटमध्ये ताहिरचं नाव गोलंदाजांमध्ये घ्यावंच लागणार. या स्वरूपात त्याच्या ४०० पेक्षा अधिक विकेट्स आहेत. ताहिर याला दक्षिण आफ्रिकेचा सर्वकालीन महान फिरकीपटू मानले जाते. वयाच्या चाळीशीनंतर ही मैदानावरील त्याचा वावर लक्षणिय स्फूर्तीदायक असतो.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मुंबईकर’ सौरभला हटवून मोनांक पटेलकडे अमेरिका वनडे संघाचे नेतृत्व
भारताची ‘अनलकी त्रिमूर्ती’! ज्यांना मिळायला हवी होती दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी