---Advertisement---

मुंबईसाठी आजचा विजय अनिवार्य, घरच्या मैदानावर कोलकाता नाईड रायडर्सचे कडवे आव्हान । MI Vs KKR

On: शुक्रवार, मे 3, 2024 5:51 PM
---Advertisement---

प्ले ऑफमधील आव्हान टिककून ठेवण्यासाठी हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्स संघालासाठी आजचा विजय अत्यंत महत्वाचा आहे. आज (दि. 3 मे) शुक्रवार रोजी कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स हे कडवे प्रतिस्पर्धी आमने सामने असतील. विजयासाठी आतुरलेली टीम मुंबई इंडियन्स आणि तुफान फॉर्मात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना असणार आहे. ( Ipl 2024 Mumbai Indians Vs Kolkata Knight Riders Match Live Prediction )

मुंबईला मागील चार सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळावे लागले होते. त्यातील तीन सामन्यात मुंबईला पराभव पाहावा लागला. तरअवघ्या एका सामन्यात विजय मिळाला आहे. आता घरच्या मैदानावर कोलकाताविरुद्ध विजय मिळवून मुंबईला ‘प्ले-ऑफ’च्या आशा कायम कराव्या लागतील.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाला 10 पैकी केवळ तीन सामने जिंकता आले आहे. त्यामुळे अवघ्या सहा गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या म्हणजेच नवव्या स्थानावर आहे. तर नऊ सामन्यांत सहा विजय मिळवत 12 गुणांसह कोलकाताचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

आजचा सामना
वेळ : सायं. 7.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस 1, 1 हिंदी, जिओ सिनेमा एप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---