---Advertisement---

तब्बल 12 वर्षांनंतर कोलकाताकडून मुंबईचा वानखेडेवर पराभव, 8व्या पराभवामुळे मुंबईच्या प्लेऑफच्या आशा धूसर

Kolkata Knight Riders
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2024 मधील 51वा सामना काल (दि. 3 मे 2024) रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल मधील पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात कोलकाताने मुंबईवर तब्बल 24 धावांनी शानदार विजय मिळवला. यासह कोलकाताने तब्बल 12 वर्षांनंतर अर्थात 2013 नंतर प्रथमच वानखेडेवर मुंबईला पराभूत केले.

सामन्यात अगोदर फलंदाजी करताना कोलकाताने व्यंकटेश अय्यरच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद 169 धावा केल्या होत्या. परंतू त्याच्या प्रत्युत्तर दाखल मुंबई संघाने केवळ 145 धावा केल्या. 18.5 षटकात मुंबईचा संघ सर्वबाद झाला. मिचेल स्टार्कने टाकलेल्या 19 षटकात त्याने 3 बळी आणि एकूण सामन्यात निर्णायक 4 बळी घेत कोलकाताचा विजय सोप्पा केला. ( IPL 2024 Kolkata Knight Riders Beat Mumbai Indians By 24 Runs )

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---