---Advertisement---

आयपीएल दरम्यान मोठी घडामोड! वेस्ट इंडिजच्या यष्टीरक्षकावर 5 वर्षांची बंदी, मॅच फिक्सिंगसह अनेक आरोप सिद्ध

West Indies
---Advertisement---

क्रिकेट विश्वात सध्या आयपीएलची धूम आहे. या दरम्यान वेस्ट इंडिजमधून एक मोठी बातमी आली आहे. आयसीसीनं 34 वर्षीय कॅरेबियन क्रिकेटर डेवॉन थॉमसवर 5 वर्षांसाठी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे. थॉमसनं कबूल केलं की त्यानं श्रीलंका क्रिकेट (एसएलसी), अमिराती क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) च्या 7 अँटी करप्शन कोडचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे आयसीसीनं त्याच्यावर कडक कारवाई करत त्याला 5 वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं डेवॉन थॉमसला गेल्या वर्षी मे महिन्यात 7आरोपांवरून निलंबित केलं होतं. आता मात्र त्याच्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्याच्यावर मॅच फिक्सिंगचाही आरोप होता आणि याबाबतच स्पष्टीकरण देण्यासाठी त्याला 14 दिवसांचा वेळ देण्यात आला होता.

आयसीसीच्या इंटिग्रिटी युनिटचे महाव्यवस्थापक ॲलेक्स हेल्स यांनी एक निवेदन जारी करत सांगितलं की, “आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत आणि फ्रँचायझी क्रिकेट खेळलेल्या डेवॉन थॉमसनं भ्रष्टाचारविरोधी अनेक सत्रांमध्ये भाग घेतला होता. त्याला याची जाणीव होती की, ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि फ्रँचायझी क्रिकेट’ या संस्थेच्या अंतर्गत भ्रष्टाचार संहिता त्याच्या जबाबदाऱ्या काय होत्या. पण तो त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे ही बंदी लागू करण्यात आली. याद्वारे भ्रष्टाचारात गुंतलेल्या इतर खेळाडूंनाही संदेश मिळतो की असं करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”

डेवॉन थॉमस यानं वेस्ट इंडिजसाठी 1 कसोटी सामना खेळला आहे, ज्यामध्ये त्यानं 31 धावा करत 2 बळी घेतले होते. याशिवाय त्यानं वेस्ट इंडिजसाठी 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 238 धावा आणि 2 बळी, तर 12 टी-20 सामन्यांमध्ये 51 धावा केल्या आहेत. त्यानं वेस्ट इंडिजसाठी शेवटचा सामना 2022 मध्ये खेळला होता.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषकाच्या संघातून वगळल्यानंतर रोहित शर्मानं घेतली रिंकू सिंहची भेट, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

टी20 विश्वचषकाचं काउंटडाउन सुरू, आयसीसीनं रिलिज केलं स्पर्धेचं अधिकृत गाणं

राहुल, रिंकूला टीममधून का वगळलं? हार्दिक पांड्याची निवड कशामुळे झाली? रोहित-आगरकरनं दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---