---Advertisement---

दुष्काळात तेरावा महिना! चेन्नईचे तब्बल 5 गोलंदाज विविध कारणांमुळे बाहेर

---Advertisement---

आयपीएल 2024 मध्ये 5 वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी संमिश्र राहिली आहे. संघानं आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 5 सामने जिंकले असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. मात्र त्यांच्यासाठी स्पर्धेचा पुढचा रस्ता कठीण वाटतोय. टीमचे काही खेळाडू जखमी झाले असून काही आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी मायदेशी परतले आहेत.

बुधवारी पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज दीपक चहर केवळ 2 चेंडू टाकून ड्रेसिंग रूममध्ये परतला. त्याची फिटनेस सध्या चिंतेचा विषय बनली आहे. चेन्नईसाठी दीपक चहर व्यतिरिक्त सध्या अनेक गोलंदाज उपलब्ध नाहीत.

आयपीएल 2024 मध्ये दीपक चहरचा फॉर्म फारसा चांगला राहिलेला नाही. त्यानं आतापर्यंत फक्त 5 विकेट घेतल्या आहेत. त्याला गेल्या बऱ्याच दिवसांपासून हॅमस्ट्रिंगची दुखापत सतावत आहे. तो पंजाब किंग्जविरुद्ध केवळ 2 चेंडू टाकून ड्रेसिंग रूममध्ये परतला आणि त्यानंतर संपूर्ण सामन्यादरम्यान गोलंदाजी करण्यासाठी परतला नाही.

चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सामना झाल्यानंतर सांगितलं की, चहरची दुखापत गंभीर असू शकते. स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, “दीपक चहरची प्रकृती ठीक नाही. तरीही आम्हाला सकारात्मक अहवालाची अपेक्षा आहे. फिजिओ आणि डॉक्टर लवकरच त्याची तपासणी करतील.”

सध्या चेन्नईच्या संघातील केवळ दीपक चहरच नाही तर तुषार देशपांडे, मुस्तफिजूर रहमान, महिशा तीक्ष्णा आणि माथिशा पाथीराना हे वेगवान गोलंदाज देखील सिलेक्शनसाठी उपलब्ध नाहीत. तीक्ष्णा आणि पाथीराना हे श्रीलंकेचे खेळाडू व्हिसाच्या कामासाठी मायदेशी गेले आहेत. तुषार देशपांडे याला फ्लू झाला होता. त्यामुळे तो पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. याशिवाय येथून पुढे मुस्तफिजुर रहमानही संघाचा भाग नसेल. येत्या 3 मेपासून बांग्लादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी मुस्तफिजूर मायदेशी परतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

डॅरेल मिशेलनं पूर्ण केल्या 2 धावा, मात्र धोनी क्रिजवरून हललाही नाही; चेन्नई विरुद्ध पंजाब सामन्यात मोठा ड्रामा

अखेर ‘थाला’ची विकेट गेली! आयपीएल 2024 मध्ये प्रथमच झाला बाद; पंजाब किंग्जविरुद्ध रनआऊट होऊन परतला तंबूत

‘किंग्ज’च्या लढतीत पंजाबची बाजी, घरच्या मैदानावर चेन्नईचा दारुण पराभव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---