क्रिकेटच्या मैदानात नेहमीच खेळाडू दुखापतग्रस्त होत असतात. प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी 100 टक्के देण्याच्या प्रयत्नात काही वेळा गंभीर दुखापतीचे शिकार बनतात. असेच काहीसे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर सोबतही घडले असते, पण सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाहीये. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात वॉर्नरसोबत हा प्रकार घडला.
आयसीसी टी-20 विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. पण त्याआधी ऑस्ट्रेलियाने मायदेशात इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका बुधवारी (12 ऑक्टोबर) गमावली. या मालिकेतील दुसरा सामना इंग्लंडने बुधवारी 8 विकेट्सच्या अंतराने जिंकला. तत्पूर्वी पहिल्या टी-20 सामन्यात देखील पाहुण्या संघाने 8 धावांच्या अंतरानेच विजय मिळवला होता. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. इंग्लंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभी केली होती.
इंग्लंड संघ फलंदाजी करत असताना 15 व्या षटकात डेविड वॉर्नर (Devid Warner) सोबत ङा अपघात घडला. मिचेल स्टार्क (Mitchel Starc) या षटकात गोलंदाजी करत होता. षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोईन अली (Moeen Ali) याने कवर्सच्या वरून शॉट मारला. त्याठिकाणी वॉर्नर क्षेत्ररक्षणासाठी ओभा होता. त्याने चेंडू रोखण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हाती आला नाही. यादरम्यान त्याचे डोके जोरात जमिनीवर आदळले. यानंतर वॉर्नरला चांगल्या वेदना होत असल्याचेही दिसले. तसेच त्याला काही वेळा चक्कर आल्यासारखे देखील वाटत होते. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांंनी त्याची चाचणी केली आणि सुदैवाने सर्व गोष्ट सामान्य असल्याचे सांगितले गेले.
David Warner is off the ground and being checked out after landing heavily attempting this catch #AUSvENG pic.twitter.com/mDKDsJBhte
— cricket.com.au (@cricketcomau) October 12, 2022
डोक्याला इजा झाल्यानंतर त्याला मैदानातून बाहेर केले गेले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर त्याने फलंदाजी करण्यासाठी पुन्हा मैदानात पुनरागमन केले. मात्र, संघासाठी तो काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने फलंदाजी करताना 11 चेंडू खेळले आणि अवघ्या चार धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या मिळालेल्या पराभवासाठी वॉर्नरची ही खराब खेळी महत्वाची ठरली. सामन्याचा एकंदरीत विचार जर केला, तर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्सच्या नुकसानावर 178 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान ऑस्ट्रेलिया 6 विकेट्सच्या नुकसानावर 170 धावांपर्यंत मजल मारू खकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जेव्हा पंच असलेल्या वडिलांनी ‘बाप’ निर्णय घेत फलंदाज मुलाला दिले होते बाद
Asia Cup 2022: शफाली-हरमनप्रीतच्या महत्वपूर्ण खेळीने उपांत्य फेरीत भारताचे थायलंडसमोर 149 धावांचे लक्ष्य






