आयपीएलच्या तेराव्या हंगामातील १७वा सामना रविवारी (४ ऑक्टोबर) शारजाह येथे झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले होते. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला २०९ धावांचे भलेमोठे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात हैदराबादनेही चांगली फलंदाजी केली, पण ३४ धावांनी त्यांनी सामना गमावला. दरम्यान मुंबईचा खेळाडू इशान किशनने क्षेत्ररक्षण करताना अतुलनीय कामगिरी केली.
नाणेफेक जिंकून मुंबईने सुरुवातीला फलंदाजी करण्याची निर्णय घेतला. पण पहिल्या ६ षटकांच्या आतच संघाला २ मोठे धक्के बसले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ६ धावांवर आणि सूर्यकुमार यादव २७ धावांवर बाद झाला. पण सलामीला फलंदाजीसाठी आलेला यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आणि इशान किशनने पुढे संघाचा डाव सावरला. इशानने २३ चेंडूत एक चौकार आणि २ षटकार मारत ३१ धावा ठोकल्या. परंतु हैदराबादच्या खेळाडूंनी मिळून त्याला झेलबाद केले.
पुढे मुंबईच्या या धुरंधरने आपल्या विकेटचा चांगलाच सूड घेतला. मुंबईचे २०९ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी कर्णधार डेविड वॉर्नर विकेट सांभाळून फलंदाजी करत होता. त्याने सलामीला फलंदाजीला येत १५व्या षटकापर्यंत ४१ चेंडूत ५८ धावा केल्या. त्यामुळे संघाला विजयासाठी ३० चेंडूत ७० धावा करायच्या होत्या. वॉर्नर फलंदाजी करत असल्यामुळे हे शक्यही वाटत होते.
पण पुढील १६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. महत्त्वाचे म्हणजे, वॉर्नरचा तो झेल इशानने पकडला होता. झाले असे की, वॉर्नरने जेम्स पॅटिसनच्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागला आणि मागील बाजूला उभा असलेल्या इशानने उडी मारत तो चेंडू पकडला.
इशानच्या या अप्रतिम झेलनंतर इंडियन प्रीमियर लीग ऑफिशियलने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर इशानचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “इशान किशनद्वारे डेविड वॉर्नरचा अप्रतिम झेल. त्यामुळे वॉर्नरला सामना मध्येच सोडून पव्हेलियनला जावे लागले.”
What a catch ishan.. 🔥#MI #MIvsSRH pic.twitter.com/TRbNjZSdRW
— Lokesh (@AryaLokesh05) October 4, 2020
What a catch ishan.. 🔥#MI #MIvsSRH pic.twitter.com/TRbNjZSdRW
— Lokesh (@AryaLokesh05) October 4, 2020
https://twitter.com/Cric_life59/status/1312747984514240512?s=20
A fine catch by Ishan Kishan ends David Warner's stay out there in the middle.#SRH are five down with 142 runs on the board.
Live – https://t.co/JbJimPPCsF #Dream11IPL pic.twitter.com/G3PNtewdK3
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2020
Ishan Kishan What A Catch 😭💙 pic.twitter.com/pWPvWE95Dm
— R A T N I S H (@LoyalSachinFan) October 4, 2020
What a catch by ishan kishan #OneFamily @mipaltan pic.twitter.com/tEpeCPSKdg
— MUMBAI INDIANS FC KARNATAKA (@MIFCKARNATAKA) October 4, 2020
तसेच चाहत्यांनाही इशानचा तो अप्रितम झेल खूपच आवडला असल्याचे दिसत आहे. अनेक चाहत्यांनी इशानच्या झेलचा व्हिडिओ शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
व्वा रे पठ्ठ्या तू तर कमालंच केली, अंतिम षटकाच्या ४ चेंडूंवर २० धावा ठोकल्या
VIDEO: दबंग पांडे! इशान किशनला तंबूत धाडणारा ‘हा’ अफलातून झेल एकदा पाहाच..
ट्रेंडिंग लेख-
विजयासाठी आसुसलेल्या चेन्नईला हरवायचंय.. पंजाबला करावे लागतील ३ महत्वाचे बदल….
वाढदिवस विशेष: यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?
अनुभवी खेळाडूंचा भरणा असणाऱ्या चेन्नईला लोळवणारा १९ वर्षांचा पोरगा, वाचा ‘त्याच्या’ संघर्षाची कहानी