क्रिकेटविश्वात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांदरम्यान होणाऱ्या सामन्यांची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहातात. जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने येतात, तेव्हा एकमेकांना पराभूत करण्याबद्दल खेळाडूंमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तणावाचे वातावरण असते. मात्र ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नर आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो हे दोघेही हैदराबाद संघाकडून खेळत आहे. ते दोघेही सलामीला फलंदाजी करतात. बेयरस्टोबद्दल बोलताना वॉर्नरने सांगितले की, आम्हा दोघांनाही एकमेकांसोबत फलंदाजी करायला मजा येते.
मागील 3 आयपीएल हंगामापासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे हे स्टार खेळाडू एकाच संघासाठी एकत्र खेळत आहेत आणि या दोघांमध्ये चांगला ताळमेल असल्याचे दिसून येते. मागील दोन हंगामाप्रमाणेच या हंगामातही डेविड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो शानदार फलंदाजी करत आहेत. दोन्ही खेळाडू विरोधी संघाच्या गोलंदाजीवर मोठे फटके खेळत आहेत. या दोघांकडे बघून असे कधीच वाटत नाही की यांच्यात स्पर्धा सुरु आहे.
किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळलेल्या सामन्यात वॉर्नर व बेयरस्टोने शानदार फलंदाजी केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 160 धावांची शानदार भागीदारी केली. सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने बेयरस्टोबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
सामन्यानंतर वॉर्नर म्हणाला, “लोकांना वाटते की या 2 देशात (ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड) एकमेकांविरुद्ध द्वेष आहे पण असे मला मुळीच वाटले नाही. खेळताना मी बेयरस्टोला फलंदाजीसाठी अधिक संधी देत होतो. आम्ही दोघेही एकत्र फलंदाजीचा आनंद घेत आहोत. आम्ही गोलंदाजीवर आक्रमण करण्याचा विचार केला आणि आम्हाला त्यात यश आले. आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगला खेळ केला. राजस्थानविरुद्ध आम्हाला पुढील सामना खेळावा लागेल. आशा आहे की आम्ही पुन्हा 200 धावा करु.”
महत्त्वाच्या बातम्या-
-धोनी आऊट व्हायचं नावच घेत नाही, कसं ते वाचा थोडक्यात
-‘आम्ही संघाचे उत्तम संयोजन केले, म्हणूनच..’ KKR च्या प्रशिक्षकाने सांगितले कुलदीपला वगळण्याचे कारण
-फ्रेंच ओपन २०२०: श्वार्टझमनला पराभूत करून नदालचा फायनलमध्ये प्रवेश, जोकोविचशी होणार अंतिम लढत
ट्रेंडिंग लेख-
-शेन वॉर्नने त्याला म्हटले होते भारताचा मोठा स्टार; पण ‘तो’ अचानकच झाला आयपीएलमधून गायब आणि आता…
-किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला