कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना ज्यादाचा विश्रांतीचा वेळ मिळाला आहे. या वेळेत काही खेळाडू मजा करताना दिसत आहेत. वेस्ट इंडिज संघाचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल देखील आपली सुट्टी मजेत घालवत आहे. गेल क्रिकेट मैदानावर व मैदानाच्या बाहेरही कायम विनोदी मानसिकतेत असतो. सोशल मीडियावर तो अनेकवेळा आपल्या पार्ट्यांचे फोटो शेअर करत असतो. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला होता, ज्यावर डेव्हिड वॉर्नरने त्याला भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
गेलने आपल्या सुट्टीचा काही काळ मालदीवमध्ये देखील घालवला होता. दरम्यान हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, ऑस्ट्रेलियन खेळाडूंना ऑस्ट्रेलियामध्ये प्रवास करण्यास बंदी असल्यामुळे सर्व खेळाडूंना मालदीवमध्ये काही वेळ रहावे लागले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स प्रमाणेच ख्रिस गेलही सुट्टीसाठी मालदीवला रवाना झाला होता. ऑस्ट्रेलियन खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत, तरी गेल अद्याप सुट्टीची मजा संपवून घरी जाण्याच्या मानसिकतेत नाही. मालदीवमध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर आता तो दुबईमध्ये मजा घेत आहे.
गेलने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यावर ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने गेलची फिरकी घेतली आहे. गेलने शेअर केलेल्या छायाचित्रात तो टॉय कारसह पोज देताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CPLtEReBK1O/
ज्यावर वॉर्नरने प्रतिक्रिया दिली की, ‘ती माझ्या कारसारखी दिसते.’ वॉर्नरची ही मजेशीर कमेंट नेटकऱ्यांना देखील मोठ्याप्रमाणात पसंद पडली आहे.

आगामी जुलैमध्ये वॉर्नर आणि गेल दोघेही मैदानावर आमने-सामने दिसू शकतात. जुलैमध्ये ऑस्ट्रेलियन संघ 5 टी-20 सामने आणि 3 एकदिवसीय सामन्यांसाठी वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहेत. ख्रिस गेलच्या आंतरराष्ट्रीय टी20 कामगिरीचा विचार केला असता त्याने वेस्टइंडीज कडून 58 सामने खेळलेले आहेत. यादरम्यान गेलने 32.54 च्या सरासरीने 1,627 धावा केलेल्या आहेत. गेलने अंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 2 शतक आणि 13 अर्धशतके देखील झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट-अनुष्काची पुन्हा अभिमानास्पद कामगिरी, दुर्मिळ आजार असलेल्या अयांशला केली ‘ही’ मदत
PUMA ने शब्द पाळला! बर्लच्या ट्विटमुळे संपूर्ण झिम्बाब्वे संघासाठी पाठवले नवे बुटांचे जोड, पाहा फोटो
विराटचा नवा लूक व्हायरल; चाहते म्हणतात, हा तर मनी हाईस्टमधील प्रोफेसरचा देसी व्हर्जन






