आयपीएलच्या १४ व्या सत्राला एप्रिल महिन्यापासून प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा भारतात आयोजित होण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत कुठलाही निर्णय घेतला गेला नाहीये. १८ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव देखील आयोजित करण्यात आला होता. यात एकूण २९२ खेळाडूंपैकी ८ संघांमध्ये ५७ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. अशातच सनराइजर्स हैदराबाद संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. त्यांचा एक महत्वाचा खेळाडू आयपीएल २०२१ स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो.
आयपीएल स्पर्धेत सनराइजर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करणारा ऑस्ट्रेलियन संघाचा डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा आयपीएल २०२१ स्पर्धेतून दुखापतीमुळे बाहेर होऊ शकतो. वॉर्नरच्या जाण्याने सनराइजर्स हैदराबाद संघाला मोठा फटका बसू शकतो.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान २०२० मध्ये झालेल्या वनडे आंतरराष्ट्रीय मालिकेत खेळताना त्याला दुखापत झाली होती. या मालिकेतील दुसरा सामना खेळत असताना त्याला ग्रॉइन (मांडीचा सांधा) इंज्युरी झाली होती. याच कारणास्तव तो वनडे मालिकेतून बाहेर झाला होता. त्यांनतर त्याने कसोटी मालिकेत पुनरागमन केले परंतु त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दुखपातग्रस्त असल्यामुळे त्याला एनएसडब्ल्यूच्या मार्श शेफील्ड शील्ड स्पर्धेतून बाहेर राहावे लागले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, डेव्हिड वॉर्नरला या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी ६ ते ९ महिन्यांचा अवधी लागू शकतो. यामुळे तो आयपीएल २०२१ स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. याबाबत बोलताना वॉर्नर म्हणाला, “मी तंदुरुस्त होण्याचा प्रयत्न करतो आहे. पण मला अजूनही काही समस्या जाणवत आहेत. पुढील सहा ते नऊ महिन्यांचा काळ काहीसा कठीण असेल, मात्र आयपीएलसाठी मी तंदुरुस्त होण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे.”
महत्वाच्या बातम्या:
डबल धमाका! अहमदाबाद कसोटीत द्विशतक झळकावणारे ५ धुरंधर, तिघे आहेत भारतीय
विराट कोहलीसह खेळण्याबाबत सूर्यकुमार यादवने दिली प्रतिक्रिया, म्हणाला