ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान (Australia Tour Of Pakistan) दौ-यावर आहे. तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. उभय संघांमध्ये रावळपिंडी येथे झालेला पहिला कसोटी सामना कमालीचा निरस ठरला. पाच दिवसात तीन डावही पूर्ण न झाल्याने सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला वॉर्नर
फलंदाजांना उपयुक्त ठरेल अशी खेळपट्टी बनवल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डवर टीका होत आहे. पाकिस्तानच्या अनेक दिग्गजांनी क्युरेटर व बोर्डावर नाराजी व्यक्त केली. खुद्द पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा हे देखील या खेळपट्टीमूळे खुश दिसले नाहीत. मॅच रेफ्री रंजन मदुगले यांनी या खेळपट्टीला सरासरीपेक्षा वाईट अशी रॅंकींग दिली होती. आयसीसीनेही यावर कारवाई करत एक डिमेरिट पॉईंट दिला.
मुंबई संघांमधील दुसरा सामना १२ ते १६ मार्च या कालावधीत लाहोर येथे खेळला जाईल. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,
“दुसऱ्या सामन्यात कशी खेळपट्टी मिळेल हे माहीत नाही. मात्र, गोलंदाजांनी कमीत कमी २० संधी निर्माण कराव्या अशी खेळपट्टी हवी. पहिल्या सामन्यात खेळपट्टी अत्यंत खराब होती ज्यावर गोलंदाजांसाठी काहीच होते.”
पहिल्या सामन्यात निघाल्या ११०० धावा
तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी येथे खेळला गेला. फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या या खेळपट्टीवर दोन्ही संघाच्या फलंदाजांनी यथेच्छ फलंदाजी केली. पहिल्या डावात पाकिस्तानसाठी इमाम उल हक व अझर अली यांनी शतके ठोकली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने फलंदाजी करताना सलामीवीर उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लॅब्युशेन व स्टीव स्मिथ यांच्या फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला केवळ सात धावांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर इमाम व अब्दुल्ला यांनी नाबाद द्विशतकी भागीदारी केल्याने पाचव्या दिवशी सामना अनिर्णित करण्याचा दोन्ही कर्णधारांनी निर्णय घेतला.
महत्वाच्या बातम्या-
रावळपिंडी कसोटीतील खेळपट्टीमूळे पुन्हा पाकिस्तानची नाचक्की; आयसीसीनेही केली कारवाई (mahasports.in)