ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये पार पडलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा विजय मिळवला. यानंतर आता दोन्ही संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत समोरासमोर येतील. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन खेळाडू मुंबईत दाखल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा देखील मुंबई येथे पोहोचल्यानंतर रस्त्यावर लहान मुलांसह गल्ली क्रिकेट खेळताना दिसून आला. तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
वॉर्नर याने आपल्या इंस्टाग्राम हँडलवरून आधी एक छायाचित्र पोस्ट केले. यामध्ये तो मुंबईच्या रस्त्यावरून प्रवास करताना दिसतोय. त्यानंतर त्याने काही वेळानंतर एक व्हिडिओ देखील पोस्ट केला. यामध्ये तो मुंबईचा रस्त्यांवर लहान मुलांसह क्रिकेटचा आनंद घेताना दिसला.
वॉर्नर याला भारतामध्ये ऑस्ट्रेलियाइतकेच प्रेम मिळते. तो अनेक वर्षांपासून भारतात आयपीएल खेळण्यासाठी येतो. सनरायझर्स हैदराबादसाठी खेळताना त्याने अमाप प्रसिद्धी मिळवली. तो सातत्याने भारतीय भाषांमधील रिल्स सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याचा भारतातील चाहता वर्ग देखील मोठा आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान चा पहिला वनडे सामना 17 मार्च रोजी मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर वॉर्नर मायदेशी परतला होता. यानंतर त्याने वनडे मालिकेसाठी त्याने संघात पुनरागमन केले आहे. आपल्या अखेरच्या भारत दौऱ्यावर तो शानदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.
वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ-
स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍश्टन अगर, ऍलेक्स केरी, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झ्ये रिचर्डसन, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा
(David Warner Play Gully Cricket In Mumbai Before First ODI Against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ट्विटरवर अडचणीत सापडला अश्विन! थेट एलॉन मस्कला टॅग करत मागितला सल्ला, नक्की काय घडलंय वाचाच
महिला कुस्तीपटूंसाठी खूशखबर! ‘या’ तारखेला रंगणार पहिल्या ‘महिला महाराष्ट्र केसरी’चा थरार