---Advertisement---

फलंदाजीला जाण्याआधी वॉर्नर, बर्न्स खेळत होते हा खेळ, व्हिडिओ झाला व्हायरल

On: शुक्रवार, नोव्हेंबर 29, 2019 2:56 PM
---Advertisement---

आजपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान(Australia vs Pakistan) संघात दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. ऍडलेड ओव्हल(Adelaide Oval) मैदानावर होत असलेला हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंजदाजीसाठी डेव्हिड वॉर्नर(David Warner) आणि जो बर्न्स(Joe Burns) ही सलामीवीरांची जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली. परंतू मैदानात फलंदाजीसाठी जाण्याआधी ते रॉक-पेपर-सीजर (rock-paper-scissors) हा बैठा खेळ खेळताना दिसून आले आहेत.

झाले असे की पावसामुळे हा सामना सुरु होण्यासाठी थोडा उशीर झाला. त्यामुळे त्याआधी वॉर्नर आणि बर्न्स ड्रेसिंग रूम मध्ये रॉक-पेपर-सीजर हा खेळ खेळताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ Cricket.com.auने ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात बर्न्सने मात्र लवकर विकेट गमावली. तो शाहिन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर 4 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर वॉर्नर आणि मार्नस लॅब्यूशानेने(Marnus Labuschagne) ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळताना नाबाद अर्धशतके केली.

तसेच ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सत्राखेर 1 बाद 139 धावसंख्या गाठून दिली आहे. दुसऱ्या सत्राखेर वॉर्नर 72 धावांवर आणि लॅब्यूशाने 60 धावांवर नाबाद खेळत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---