David Warner Retirement: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नर याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सिडनीमध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी करत 8 विकेट्स राखून विजय मिळवला. वॉर्नरने दुसऱ्या डावात 57 धावा करत अर्धशतक झळकावले. कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीनंतर वॉर्नरने सर्वांचे आभार मानले. त्यानी पत्नी कँडिस आणि आई वडिलांचे आभार मानले.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने आपल्या कुटुंबाबद्दल सांगितले की, “सपोर्टशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. माझ्या चांगल्या संगोपनाचे पूर्ण श्रेय मी माझ्या पालकांना देतो. मी माझा भाऊ स्टीव्हच्या पावलावर पाऊल टाकले.” (david warner retirement farewell test thanks his wife candice for support australia vs pakistan)
आई-वडील आणि भावानंतर वॉर्नरने आपल्या पत्नीबद्दल म्हणाला की, “आणि मग कँडिस माझ्या आयुष्यात आली. आमचे एक सुंदर कुटुंब आहे आणि मी त्यांच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची कदर करतो. मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. मी खूप भावूक होईन. कँडिस तू जे काही केले त्याबद्दल धन्यवाद. तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस, मी तुमचा आभारी आहे.”
वॉर्नर आणि कँडिसचे एप्रिल 2015 मध्ये लग्न झाले. या दोघांचे नाते खूप घट्ट आणि चांगले राहिले आहे. वॉर्नरला तीन मुली आहेत. सोशल मीडियावर तो अनेकदा आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. वॉर्नरने पत्रकार परिषदेद्वारे निवृत्तीची बातमी दिली होती. त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
वॉर्नरने आतापर्यंत 112 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 8786 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 26 शतके आणि 3 द्विशतके झळकावली आहेत. त्याने 37 अर्धशतकेही केली आहेत. वॉर्नरची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या 335 ही आहे. वॉर्नरने 161 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6932 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 22 शतके आणि 33 अर्धशतके केली आहेत. (David Warner After the last match, Warner thanked his parents got emotional talking about his wife)
हेही वाचा
Afghanistan Squad: भारत दौऱ्यात प्रमुख अफगाणी खेळाडूंचे पुनरागम, टी-20 मालिकेसाठी ‘असा’ आहे संघ
David Warner । उस्मान ख्वाजाची आई करते वॉर्नरचा ‘सैतान’ म्हणून उल्लेख, सलामीवीर फलंदाजानेच सांगितले कारण