---Advertisement---

सिडनीतील हवामान पाहून डेविड वॉर्नरला फुटला घाम; म्हणाला, “हा अंदाज चुकीचा असावा”

On: गुरूवार, डिसेंबर 31, 2020 11:38 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या ‘बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिज’चे दोन कसोटी सामने संपले आहेत. त्यानंतर तिसरा सामना सिडनी येथे नवीन वर्षात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याद्वारे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. भारताविरुद्ध वनडे मालिकेदरम्यान दुखापती झालेला वॉर्नर आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असल्याचे समजत आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात तो सलामीला फलंदाजी करताना दिसेल. तत्पुर्वी सिडनीतील वातावरणामुळे वॉर्नर चिंतेत असल्याचे दिसत आहे.

पुढील नऊ दिवस सिडनीत ढगाळ वातावरण

येते नऊ दिवस सिडनी शहरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ १ आणि २ जानेवारी रोजी पाऊस पडण्याची शक्यता ५० टक्केपेक्षा कमी आहे. मात्र उर्वरित दिवशी पाऊस पडण्याची संभावना ५० टक्के पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. याचा तिसऱ्या कसोटी सामन्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

यामुळे वॉर्नर चितेंत आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर सिडनीतील पुढील ९ दिवसांच्या हवामानाचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. सोबतच ‘हा अंदाज चुकीचा असावा’, अशी आशा व्यक्त केली आहे.

दोन्ही संघांसाठी तिसरा कसोटी सामना महत्त्वाचा

नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सने विजय मिळवला. यासह मालिकेत १-१ ची बरोबरी झाली आहे. त्यामुळे सिडनीत होणारा तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ हा सामना जिंकत मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी झगडताना दिसतील.

सिडनीच्या मैदानावरच झाली होती दुखापत

भारतीय संघाविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान वॉर्नरला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षणावेळी एक चेंडू पकडत असताना त्याच्या मांडीला जखम झाली होती. त्यामुळे पुढील तिसऱ्या वनडे सामन्यातून त्याला बाहेर करण्यात आले होते. तसेच तो भारताविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेतही खेळू शकला नव्हता. याशिवाय त्याला कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यांनाही मुकावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताला मोठा झटका! प्रमुख वेगवान गोलंदाज उमेश यादव कसोटी मालिकेतून बाहेर

दहावी विकेट काढण्यासाठी विलियम्सनने ‘अशी’ लढवली शक्कल, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल प्रशंसा

जागतिक कसोटी क्रमवारीत न्यूझीलंडची अव्वल स्थानी झेप, ‘या’ संघाला टाकले मागे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---