डेविड वॉर्नर सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याची बॅट शांत असल्याने त्याला सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद गमवावे लागले आणि आता वॉर्नरला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान मिळवणे अवघड झाले आहे. वॉर्नरला सध्या हैदराबाद संघाच्या डगआउटमध्ये समाविष्ट केले जात नाही, ज्याचे वॉर्नरने पाच वर्षे नेतृत्व केले होते आणि २०१६ मध्ये संघाला जेतेपद देखील मिळवून दिले होते. वॉर्नरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर संघातील दुःखाबाबत एक संदेश लिहून आपली वेदना व्यक्त केली आहे.
गुरुवारी (३० सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळलेल्या सामन्यात डेविड वॉर्नरचा संघात समावेश नव्हता. संघाच्या डगआऊटमध्येही वॉर्नर दिसत नसल्याने तर चर्चांना उधाण आहे. वॉर्नर सामन्यादरम्यान हॉटेलच्या खोलीत थांबला आणि तेथून टीव्हीवर सामना पाहिला.
त्याची इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करताना वॉर्नरने लिहिले, तुमच्या समोर कोण खरा आहे हे महत्त्वाचे नाही, तुमच्या पाठीमागे कोण आहे हे महत्त्वाचे आहे.’ यासोबत वॉर्नरने एक छोटा व्हिडीओही शेअर केला आहे, ज्यात तो टीव्हीवर हैदराबादच्या संघाला चीअर करताना दिसत आहे. हैदराबादला चेन्नई विरुद्ध ६ गड्यांनी पराभव पत्करावा लागला. यासह संघ प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडला. वॉर्नरची ही अवस्था पाहून चाहतेही खूप दुःखी झाले आणि त्यांनी या चॅम्पियन खेळाडूच्या समर्थनार्थ ट्विट सुरू केले.
On every #SRH match day 'Feel bad for David Warner ' tweet mandatory. pic.twitter.com/3XHCft06In
— Ƥ (@Pallette_) September 30, 2021
डेविड वॉर्नरने आयपीएल २०२१ मध्ये खेळलेल्या ८ सामन्यांत १०७.७३ च्या स्ट्राईक रेटने फक्त १९५ धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने फक्त दोन अर्धशतके केली आहेत. हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी सूचित केले होते की वॉर्नर उर्वरित सामन्यांसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकणार नाही, कारण संघाला युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे.
ते म्हणाले होते की, ‘आम्ही आता अंतिम फेरी गाठू शकणार नाही, म्हणून आम्ही जास्तीत जास्त युवा क्रिकेटपटूंना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. युवा क्रिकेटपटूंना केवळ मैदानावरच नाही तर सेटअपमध्ये देखील जास्तीत जास्त संधी मिळतील. म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आणि डेविड वॉर्नर हा एकमेव अनुभवी खेळाडू नव्हता, जो हॉटेलमध्ये राहिला होता. आमच्याकडे बरेच युवा खेळाडू आहेत जे अद्याप मैदानावर आलेलेच नाहीत, अगदी राखीव म्हणूनही नाही. आम्हाला त्यांना संधी द्यायची होती, आमची ही योजना येत्या सामन्यांमध्येही दिसून येईल.’
महत्त्वाच्या बातम्या –
दिनेश कार्तिकचा बोलघेवडेपणा, अश्विन-मॉर्गन वाद चिघळण्यास ठरला कारणीभूत, सेहवागचा आरोप






