ऑस्ट्रेलियाचे माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर नेहमी असतो. तो नेहमी भारतीय चित्रपटांमधील अभिनेत्यांच्या चेहऱ्यावर स्वत:चा चेहरा लावून व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्यामुळे भारतामध्ये त्याचा मोठा चाहतावर्गही आहे. त्यामुळे त्याच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रियाही येत असतात. पण सध्या त्याच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहेत. त्यावर त्याच्या पत्नीने कमेंटदेखील केली आहे.
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या वॉर्नरने आपल्या पत्नीला उचलून घेतल्याचा एक कार्टून फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला त्यानी तेलुगूमध्ये कॅप्शन लिहिले आहे की, ‘नेनू निन्नू प्रेमिस्तुनानू’. याचा अर्थ असा आहे की, ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.’ वॉर्नरच्या या पोस्टवर त्याची पत्नी कँडिसने दिलचे ईमोजी कमेंटमध्ये शेअर केल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CPYAGVsLQcb/
आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगित झाल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. परंतु वॉर्नरसहित ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतामधून मालदीवला गेले होते, त्यानंतर तिथे 14 दिवस राहिल्यानंतर ते स्वदेशात परतले आहेत. सध्या वॉर्नर ऑस्ट्रेलियामध्ये 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आहे.
आयपीएल 2021 मध्ये वॉर्रनची विसरण्यासारखी कामगिरी
वॉर्नरच्या कामगिरीचा विचार केला असता त्याच्यासाठी आयपीएल 2021 स्पर्धा विसरण्यासारखी ठरली. आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणल्या जाणाऱ्या वॉर्नरला 6 सामन्यांनंतर सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले आणि नेतृत्त्वपदाचा मुकुट केन विलियम्सनच्या डोक्यावर चढवण्यात आला.
आयपीएल 2021 हंगामात हैदराबादने वॉर्नरच्या नेतृत्वाखाली 6 सामने खेळले. त्यातील केवळ 1 सामना जिंकण्यात संघाला यश आले. तर 5 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच त्यानंतर विलियम्सनने नेतृत्व केलेल्या एका सामन्यात देखील हैदराबादला पराभवाचाच सामना करावा लागला. वॉर्नरने या हंगामात 6 सामन्यांत 193 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
दिग्गजाने ‘फ्रि हीट’ हटवण्याचे सुचवताच, आर अश्विनने केली ‘फ्रि बॉल’ची मागणी
सुशील पुरता फसला! निर्दयीपणे केली होती सागरला मारहाण, व्हिडिओ आला समोर
आठ आंतरराष्ट्रीय संघाचे सर्वाधिक कमाई करणारे कोण आहे क्रिकेटपटू, घ्या जाणून