दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी (०८ मे) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आमना सामना झाला. या सामन्यात दिल्ली संघाला विशेष प्रदर्शन करता आले नाही आणि त्यांनी ९१ धावांनी हा सामना गमावला. या सामन्यात विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर याच्या बॅटवरही चेन्नईच्या गोलंदाजांची लवकरच अंकुश लावला. तो या सामन्यात ज्याप्रकारे बाद झाला, त्यामुळे तो बराच हताश दिसला. त्याने पंच नितीन मेनन यांना डोळे वटारून पाहिले.
त्याचे झाले असे की, वॉर्नर (David Warner) अंपायर्स कॉल नियमामुळे बाद झाला. चेन्नईच्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वॉर्नरने १२ चेंडूत १९ धावा केल्या. मात्र महिश तिक्षिणाच्या पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर वॉर्नर पायचित झाला. थिक्षिणाचा चेंडू वॉर्नरच्या पायावरील पॅडला लागल्यानंतर त्याने पंचांकडे विकेटसाठी अपील केली. त्यानंतर त्वरित पंच नितीन मेनन (Umpire Nitin Menon) यांनी बोट वर करत वॉर्नरला बाद करार केले.
मग वॉर्नरने डीआरएस घेण्याचे ठरवले. पण पंचांनी त्याला बाद दिले होते. त्यामुळे निर्णय त्याच्या बाजूने न जाता पंचांच्या बाजूने गेला. अशाप्रकारे वॉर्नरने आपली विकेट गमावल्यामुळे त्याला पंचांचा राग आला. तो विकेट गमावल्यानंतर नितीन मेननकडे एकटक रागाने पाहात होता. बराच वेळ त्याने पंचांना डोळे मोठे (Warner Stares At Umpire) करून पाहिले. त्याच्या या रिऍक्शनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
That stare from #DavidWarner to one of most pathetic umpires (#NitinMenon) of #IPL2022
This year's umpiring has been absolutely terrible. Must say that! @IPL pic.twitter.com/P0ORJEQJQo
— Bhartendu Sharma (@Bhar10duSharma) May 8, 2022
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, सीएसके (Chennai Super Kings) संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत २०८ धावा केल्या आणि दिल्लीपुढे २०९ धावांचा डोंगर उभा केला. सीएसकेकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वे याने सर्वाधिक ८७ धावा फटकावल्या. केवळ ४९ चेंडू खेळताना ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने त्याने ही शानदार खेळी केली. त्याच्याबरोबरच सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानेही ४१ धावांचे योगदान दिले. तसेच एमएस धोनीनेही ८ चेंडूत २१ धावा जोडल्या.
या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाला फक्त ११७ धावाच करता आल्या आणि १७.४ षटकात दिल्लीचा संघ सर्वबाद झाला. दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक २५ धावा केल्या. तसेच शार्दुल ठाकूरने २४ आणि कर्णधार रिषभ पंतने २१ धावा केल्या. या डावात चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग आणि ड्वेन ब्रावो यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले. त्यामुळे चेन्नईने हा सामना ९१ धावांनी जिंकला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘द वाॅल’ राहुल द्रविड चक्क दिसणार भाजपच्या मंचावर, पाहा काय आहे नक्की प्रकरण?
सीएसकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बोलला पंत; म्हणे, ‘आमचे खेळाडू कोरोना आणि फ्लू आजाराने…’
सनरायझर्स विरुद्ध नाबाद ७३ धावा करणारा फाफ स्वत:ला करू इच्छित होता ‘रिटायर आऊट’, पण का?