Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सनरायझर्स विरुद्ध नाबाद ७३ धावा करणारा फाफ स्वत:ला करू इच्छित होता ‘रिटायर आऊट’, पण का?

सनरायझर्स विरुद्ध नाबाद ७३ धावा करणारा फाफ स्वत:ला करू इच्छित होता 'रिटायर आऊट', पण का?

May 9, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
Faf-Du-Plesis

Photo Courtesy: iplt20.com


आयपीएल २०२२च्या ५४व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सनरायझर्स हैदराबादला ६७ धावांनी पराभूत केले. या विजयासह बेंगलोरने गुणतालिकेतील त्यांचे स्थान मजबूत केले आहे. बेंगलोर संघाच्या या विजयात फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगाबरोबरच कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांचेही योगदान राहिले. या सामन्यात बेंगलोरकडून सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फाफने सामन्यानंतर लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. तो सामन्यादरम्यान स्वत:ची विकेट गमावण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याने स्वत:ला आर अश्विनप्रमाणे रिटायर आऊट करण्याचेही ठरवले होते, असे त्याने म्हटले आहे.

बेंगलोर विरुद्ध हैदराबाद (RCB vs SRH) संघातील सामना दुपारी भर ऊन्हात खेळवला गेला होता. मुंबईच्या गरमीत बराच वेळ फलंदाजी करून फाफ (Faf Du Plesis) थकला होता. त्यामुळे तो बाद होऊन कार्तिकला (Dinesh Karthik) मैदानावर आणू इच्छित होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

का स्वतला रिटायर आऊट करू इच्छित होता फाफ?
सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये फाफ म्हणाला की, “खरे सांगायचे झाल्यास, मी खूप थकलो होतो, त्यामुळे मी बाद होण्यासाठी प्रयत्न करत होतो. मी बाद होऊन डीकेला फलंदाजीसाठी मैदानावर आणू इच्छित होतो. मी तर इतकाही विचार केलेला की, रिटायर आऊट (Retiring Out) व्हावे. पण तितक्यात आम्ही एक विकेट गमावली आणि डीके फलंदाजीसाठी आला.” 

“डीके (कार्तिक) खरोखरच खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. जर डीके असेच षटकार ठोकत असेल, तर आम्ही त्याला फलंदाजीची अधिकाधिक संधी देऊ. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी फार अवघड होती. बरेच फलंदाज सुरुवातीचे काही चेंडू खेळल्यानंतर धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसले. सुदैवाने हैदराबादच्या खेळाडूने डीकेचा एक झेल सोडला आणि त्याने पुढे कहर केला,” असेही डू प्लेसिसने म्हटले.

फाफची कर्णधार खेळी
दरम्यान फाफने हैदराबादविरुद्ध कर्णधार खेळी केली. त्याने सलामीला फलंदाजीला येत एक बाजू धरून ठेवली आणि अर्धशतक झळकावले. ५० चेंडू खेळताना तो ७३ धावांवर नाबाद राहिला. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ८ चौकारही मारले. त्याच्या या खेळीमुळे बेंगलोरचा संघ हैदराबादला १९३ धावांचे लक्ष्य देऊ शकला. प्रत्युत्तरात हैदराबादने १२५ धावांवरच आपल्या सर्व विकेट्स गमावल्या आणि बेंगलोरने ६७ धावांनी हा सामना जिंकला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

उगाच कोहलीला म्हणत नाहीत ‘किंग’! वादळी खेळी खेळणाऱ्या कार्तिकसाठी ड्रेसिंग रूममध्ये केले असे काही

दिल्लीवरील मोठ्या विजयानंतर सीएसके बनवू शकते का प्लेऑफमध्ये जागा? कर्णधार धोनी म्हणाला…

‘कर्वे नगरच्या पोरी, जगात भारी’, हटके पोस्टरमुळे सीएसकेचा पुणेकर चाहता आला चर्चेत


ADVERTISEMENT
Next Post
Rishabh-Pant

सीएसकेविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बोलला पंत; म्हणे, 'आमचे खेळाडू कोरोना आणि फ्लू आजाराने...'

Rahul-Dravid-BJP

‘द वाॅल’ राहुल द्रविड चक्क दिसणार भाजपच्या मंचावर, पाहा काय आहे नक्की प्रकरण?

पंचांमुळे वॉर्नर वाचवू शकला नाही आपली विकेट, बाद झाल्यानंतर असा व्यक्त केला राग- Video

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.