इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक खोऱ्याने धावा काढत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्व करताना तो संघासाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रविवारी (०८ मे) झालेल्या सामन्यातही त्याने डावाअंती फलंदाजीला येत ताबडतोब खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. परंतु त्याचा संघ सहकारी विराट कोहली याने केलेली मारलेली कौतुकाची थाप प्रशंसनीय होती.
हैदराबादविरुद्ध (RCB vs SRH) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या बेंगलोरने २० षटकात ३ विकेट्सच्या नुकसानावर १९२ धावा केल्या. यामध्ये कार्तिकच्या (Dinesh Karthik) नाबाद ३० धावांचाही समावेश होता. विशेष म्हणजे, त्याने केवळ ८ चेंडू खेळताना ३७५च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या होत्या. त्याने या खेळीदरम्यान ४ षटकार आणि १ चौकार मारला होता. त्याच्या या वादळी खेळीमुळे बेंगलोर हैदराबादसमोर भलेमोठे आव्हान उभे करू शकले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कार्तिकच्या या धमाकेदार खेळीनंतर नॉन स्ट्राईकवर उभा असलेला कर्णधार फाफ डू प्लेसिसने (Faf Du Plesis) त्याला मिठी मारत त्याची पाठ थोपटली. बेंगलोरचा डाव संपल्यानंतर डू प्लेसिस आणि कार्तिक, हे दोघेही ड्रेसिंग रूममध्ये परतले. यावेळी कोहली (Virat Kohli) ड्रेसिंग रूमच्या दाराजवळ उभा राहून कार्तिकची वाट पाहात होता. कार्तिक ड्रेसिंग रूममध्ये येताच कोहलीने दोन्ही हात वर करत त्याला नमस्कार केला. त्यानंतर कार्तिकला मिठी मारत कोहलीने त्याची स्तुती केली. कोहलीच्या या कृतीने क्रिकेटचाहत्यांची (Kohli’s Heartwarming Gesture To Karthik) मने जिंकली आहेत.
https://twitter.com/SlipDiving/status/1523271827325259777?s=20&t=ObheJe3fHjOPCtN_7pFx7w
मात्र कोहलीला हैदराबादविरुद्धच्या विजयात पुन्हा एकदा विशेष योगदान देता आले नाही. तो सलामीला फलंदाजी करताना गोल्डन डक (पहिल्याच चेंडूवर शून्य धावेवर विकेट) झाला होता. ही त्याची आयपीएल २०२२मध्ये पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होण्याची तिसरी वेळ होती.
कर्णधाराने कार्तिकवर उधळली स्तुतीसुमने
दरम्यान बेंगलोरचा कर्णधार डू प्लेसिसने शानदार खेळीसाठी कार्तिकची स्तुती केली आहे. सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये डू प्लेसिस म्हणाला की, “जर डीके असेच षटकार ठोकत असेल, तर आम्ही त्याला फलंदाजीची अधिकाधिक संधी देऊ. खरे सांगायचे झाले तर, मी स्वतला बाद करण्यासाठी खूप प्रयत्न करतो, जेणेकरून कार्तिक फलंदाजीला येईल. मी तर इतकाही विचार केलेला की, रिटायर्ड आऊट व्हावे. पण तितक्यात आम्ही एक विकेट गमावली आणि डीके फलंदाजीसाठी आला.”
“डीके (कार्तिक) खरोखरच खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी फार अवघड होती. बरेच फलंदाज सुरुवातीचे काही चेंडू खेळल्यानंतर धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसले. सुदैवाने हैदराबादच्या खेळाडूने डीकेचा एक झेल सोडला आणि त्याने पुढे कहर केला,” असेही डू प्लेसिसने म्हटले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीवरील मोठ्या विजयानंतर सीएसके बनवू शकते का प्लेऑफमध्ये जागा? कर्णधार धोनी म्हणाला…
‘कर्वे नगरच्या पोरी, जगात भारी’, हटके पोस्टरमुळे सीएसकेचा पुणेकर चाहता आला चर्चेत
ऋतुराजने विरोधी संघाच्या वेगवान गोलंदाजाचे गायले गोडवे; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘क्या बात है’