आॅस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेविड वॉर्नर आॅगस्ट महिन्यात सुुरु होणाऱ्या कॅरेबियन प्रिमियर लीगमध्ये(सीपीएल) खेळणार आहे. तो या लीगमध्ये सेंट लुसिया स्टार्स या संघाकडून खेळेल याची माहिती सीपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.
तो सेंट लुसिया स्टार्स संघात आॅस्ट्रेलियाच्याच डॉर्सी शॉर्टच्या ऐवजी खेळणार आहे. कारण शॉर्टची आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघात निवड झाली असून तो आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाबरोबर आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे.
तसेच सीपीएलचा सहावा मोसम 8 आॅगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. या लीगचा पहिलाच सामना सेंट लुसिया स्टार्स विरुद्ध गतविजेते त्रिनबागो नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.
वॉर्नरच्या सहभागाबद्दल सेंट लुसिया स्टार्सचे व्यवस्थापक मोहम्मद खान म्हणाले, “डेविड वॉर्नरला सेंट लुसिया स्टार्ससंघात आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आत्ताच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी वॉर्नर एक आहे. तो मैदानात आणि ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या अनुभवाचा फायदा होईल. ज्यामुळे आम्ही आमचे पहिले विजेतेपद मिळवू शकतो.”
वॉर्नर जगभरातील अनेक टी20 च्या स्पर्धामध्ये खेळतो. पण तो सीपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणार आहे.
वॉर्नर मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणातील मुख्य सुत्रधार होता. त्यामुळे त्याच्यावर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने 1 वर्षांची बंदी घातली आहे.
त्यामुळे आयपीएलनेही त्याच्यावर यावर्षी खेळण्यासाठी बंदी घातली होती.
आता तो जूनच्या शेवटच्या आठवड्यात ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये विनिपेग हॉक्सिनकडून खेळणार आहे. तसेच तो जुलैमध्ये सिडनीत डार्विन स्ट्राइक लीगमध्ये त्याच्या रँडविक पीटर्सहॅम क्लबकडून खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–बहुचर्चित तमिळनाडु प्रिमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाला ११ जुलैपासून सुरुवात
–बापरे! कोण आहे हा भारतीय गोलंदाज; ज्याने केले स्टंपचे दोन तुकडे?
–वार्नरने खेचले एकाच सामन्यात तब्बल १८ षटकार , ९ थेट मैदानाबाहेर भिरकावले