डेव्हिड वॉर्नर याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वीच मी निवृत्त होणार असल्याचे त्याने सांगितले. वॉर्नरच्या मते, ऍशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने बॅटने धावा केल्या नसत्या तर त्याच क्षणी त्याने निवृत्ती जाहीर केली असती.
डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सिडनी कसोटी सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असेल आणि जास्तीत जास्त धावा करून तो या फॉरमॅटला शानदार पद्धतीने अलविदा करू इच्छितो. डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियन संघाला ज्या प्रकारची सुरुवात दिली, ते पाहता संघाला त्याची नक्कीच कमी भासेल, असे म्हणता येईल.
डेव्हिड वॉर्नरने धक्कादायक खुलासा केला की तो ऍशेस मालिकेदरम्यानच निवृत्ती घेणार होता. तो म्हणाला, “इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी मी हे स्पष्टपणे सांगितले होते. वास्तविक, माझ्याबद्दल आणि माझ्या फॉर्मबद्दल खूप चर्चा झाली आणि मी म्हणालो की, सिडनीमध्ये निवृत्ती घेणे माझ्यासाठी सर्वोत्तम असेल. परंतु ऍशेस दरम्यान लॉर्ड्स कसोटी सामन्यात मी माझ्या बॅटने धावा केल्या नसत्या, तर मी त्यावेळी निवृत्ती घेतली असती. उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याच्यासोबत माझी चांगली भागीदारी झाली होती. यानंतर मी काही चांगल्या खेळी खेळल्या. ती मालिका आम्ही जिंकली पण आता सिडनीत पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकून मालिका 3-0 ने जिंकणे खूप छान ठरेल.”
ऑस्ट्रेलियन संघाचा मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली (George Bailey) यानी सांगितले की, सिडनी कसोटी सामन्यात डेव्हिड वॉर्नर याला भव्य निरोप दिला जाईल. कसोटीशिवाय डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. (Warner was going to retire before the WTC final against India the decision was changed due to this reason)
हेही वाचा
Team India Schedule 2024: टीम इंडिया IPL आधी खेळणार कसोटी मालिका, नंतर टी20 विश्वचषक, जाणून घ्या संघाचे संपूर्ण वेळापत्रक
आफ्रिकेच्या माजी वेगवान गोलंदाजाचं धक्कादायक विधान; म्हणाला, ‘सचिन हा एकमेव फलंदाज होता जो…’