---Advertisement---

भारीच ना! डेविड वॉर्नरची पत्नी ऑलिम्पिक दर्शकांना आपल्या वाणीतून करणार मंत्रमुग्ध

---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर याला क्रिकेटविश्वातील विस्फोटक फलंदाजांमध्ये गणले जाते. वॉर्नरप्रमाणे त्याची पत्नी कैंडीस वॉर्नर हीदेखील क्रिडाक्षेत्रात पारंगत आहे. ती यावर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक 2021 मधील कार्यक्रमांमध्ये समालोचन करणार आहे. 34 वर्षीय कैंडिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिला ‘ट्राएथलोस’ आणि ‘ओपन वॉटर स्विमिंग’ या कार्यक्रमात समालोचन करणार आहे.

याबाबत बोलताना कैंडीस म्हणाली की, “मी पुरुष आणि महिला ट्राएथलोस आणि ओपन वॉटर स्विमिंग या कार्यक्रमात समालोचन करणार आहे. मी यासाठी खूपच उत्सुक आहे. कारण खेळ हे माझे पहिले प्रेम आहे.”

कैंडीस ही मागील काही महिन्यापासून आपल्या मुलींचा सांभाळ करण्यात व्यस्त आहे. त्याचदरम्यान वॉर्नर देखील इंग्लंड, यूएई, भारत आणि ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी क्रिकेट खेळण्यात व्यस्त होता. परंतु भारतात आयोजण्यात आलेला आयपीएल २०२१ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे तो सध्या आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.

कैंडीस एसएएस ऑस्ट्रेलिया आणि हेल किचेनच्या ऑस्ट्रेलिया संस्करणामध्ये सहभागी झाली होती. कैंडीसला 20 सर्फ लाइफ सेव्हिंग राष्ट्रीय पदके मिळाली आहेत. कैंडीसची 1999 आणि 2013 मध्ये न्यू साउथ वेल्स आयरवीमन म्हणून निवड झाली होती. डेव्हिड वॉर्नर आणि कैंडीस यांचे लग्न एप्रिल 2015 मध्ये झाले होते. त्यांना तीन कन्यारत्न आहेत. वॉर्नर हा आपल्या पत्नी आणि मुलींसमवेत आनंदी आयुष्य जगत आहे.

वॉर्नरविषयी बोलायचे झाले तर, त्याने एकदिवसीय, कसोटी आणि टी20 सामन्यात अनेक विक्रम केले आहेत. त्याचबरोबर तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रमुख खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

वयाच्या ४२व्या वर्षापर्यंत फिरकीपटू अश्विन क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणार!

कसोटी चॅम्पियनशीप फायनल अनिर्णीत किंवा ड्रॉ झाली तर कोण असणार विजेता? घ्या जाणून

‘विलियम्सन भारतीय असता तर तो रहाणेचा…,’ इंग्लिश दिग्गजाचे विवादास्पद विधान; झाला ट्रोल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---