---Advertisement---

‘विलियम्सन भारतीय असता तर तो रहाणेचा…,’ इंग्लिश दिग्गजाचे विवादास्पद विधान; झाला ट्रोल

On: शुक्रवार, मे 28, 2021 12:04 PM
---Advertisement---

इंग्लंड संघाचा माजी फिरकी गोलंदाज माँटी पानेसर हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो क्रिकेट असो किंवा राजकारण, आपल्या स्पष्ट बोलण्याच्या भुमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतो. अनेकदा त्याने वादग्रस्त वक्तव्य देखील केले आहेत, ज्यामुळे अनेकदा त्याच्यावर टीका केली गेली आहे. नुकतेच त्याने केन विलियम्सन आणि अजिंक्य रहाणेबद्दल ट्विट केले आहे, ज्यामुळे त्याला भारतीय क्रिकेट चाहत्यांनी धारेवर धरत ट्रोल केले आहे.

इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन याने म्हटले होते की, “जर केन विलियमसन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू असता. परंतु विराट असताना असे होणे कठीण आहे. कारण तो भारतीय नाहीये.”

यावर प्रतिक्रीया देत माँटी पानेसरने म्हटले की, “जर केन विलियमसन भारतीय असता तर तो भारतीय कसोटी संघात अजिंक्य रहाणेची जागा घेण्यासाठी उत्तम पर्याय असता.” या ट्विटवरून त्याला चाहत्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

या ट्विटवर प्रतिक्रीया देत एका युजरने लिहिले की, ‘अगदी खरं बोललात, विलियम्सनला आमच्या रणजी संघात देखील स्थान मिळाले नसते. हा काहीही बोलतो, कर्णधार मायकल वॉन जरा याच्याची संवाद साधा.’

तसेच दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘जर माँटी पानेसर भारतीय असता तर त्याची कारकीर्द देशांतर्गत क्रिकेटमध्येच संपुष्टात आली असती.’

माँटी पानेसरने भारतीय संघाविरुद्ध पदार्पण करत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा प्रारंभ केला होता. त्याची भारतात केलेली कामगिरी पाहिली तर, त्याने ८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याला २८ गडी बाद करण्यात यश आले आहे. यात ८१ धावा देत ६ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच त्याने भारतात खेळताना दोन वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. एकंदरीत त्याची भारतातील कामगिरी उल्लेखनीय आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रांचीकर धोनीचे पिंपरी-चिंचवडमधील घर पाहिले आहे का? वाचा त्याच्या पुण्यातील निवास स्थानाविषयी

इंग्लंड दौऱ्यानंतर विराट स्वत: ‘या’ धुरंधराकडे भारताचे नेतृत्त्वपद सोपवणार, माजी खेळाडूची भविष्यवाणी

किती ते प्रेम! केएल राहुलला पुन्हा फिट पाहून प्रेयसी अति आनंदित, दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---