---Advertisement---

किती ते प्रेम! केएल राहुलला पुन्हा फिट पाहून प्रेयसी अति आनंदित, दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

On: शुक्रवार, मे 28, 2021 9:43 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल हा इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत चांगल्याच फॉर्ममध्ये होता. सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप-३ फलंदाजांमध्ये असताना त्याला अपेंडिक्सच्या आजारामुळे काही आयपीएल सामन्यांना मुकावे लागले होते. आता त्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून लवकरच तो मैदानात आगमन करणार आहे.

त्याची विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी त्याने आपल्या वर्कआउटचे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यावर त्याची प्रेयसी अथिया शेट्टीने लक्षवेधी प्रतिक्रीया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांचे प्रेम प्रकरण खूप चर्चेत आहे. अथिया शेट्टी ही प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता सुनील शेट्टीची कन्या आहे. तिने केएल राहुलच्या फोटोवर आपली प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

येत्या २ जून रोजी भारतीय संघ इंग्लंडच्या दिशेने रवाना होणार आहे. या दौऱ्यासाठी केएल राहुलला देखील संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तो भारतीय संघासोबत मुंबईच्या हॉटेलमध्ये विलगिकरणात आहे. त्याने आपल्या खोलीत फिटनेसवर काम करत असतानाचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. यावर त्याची प्रयेसी अथिया शेट्टीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

परंतु तिने आपल्या भावना शब्दात न मांडता इमोजीचा वापर केला आहे. तिने हसतानाचा इमोजी शेअर करत केएल राहुलला पुन्हा फिट पाहून आनंद व्यक्त केला आहे. याच प्रतिक्रियेला प्रतिसाद देत केएल राहुलने अर्ध चंद्राचा ईमोजी शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CPTLeLKApst/?utm_source=ig_web_copy_link

आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केएल राहुलला अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळणे कठीण दिसून येत आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये शुबमन गिलने रोहित शर्मासोबत मिळून संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे.

तसेच केएल राहुलची विशेषता आहे की, तो कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम आहे. परंतु रिषभ पंत असताना त्याला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून देखील संघात स्थान मिळणे कठीण दिसत आहे. परंतु आयपीएल स्पर्धेत तो चांगल्याच फॉर्ममध्ये होता. याची दखल घेत त्याला संघात स्थान दिले जाऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आई शप्पथ तो बाद आहे’; जेव्हा विकेटसाठी भारतीय गोलंदाजाने पंचांकडे केला होता बालहट्ट

सोन्यासारखी संधी! केवळ ‘इतक्या’ विकेट्स अन् अश्विन बनेल टेस्ट चॅम्पियनशीपचा अव्वल गोलंदाज 

माजी कर्णधाराचा आपल्याच संघावर अविश्वास; म्हणे, ‘पाकिस्तान वगळता ‘हे’ संघ टी२० विश्वचषकाचे मानकरी’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---