ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी (22 नोव्हेंबर) खेळला गेला. ज्यामध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले आणि संकट ओढवून घेतले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांनी शतकी खेळी केली. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने 48 षटकात 5 विकेट्स गमावत 355 धावासंख्या उभारली. यामध्ये डेविड वॉर्नर याने तब्बल 1000 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकी खेळी करत मार्क वॉ यांचा विक्रम मोडला आहे.
डेविड वॉर्नर (David Warner) याने 1043 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केले. त्याने इंग्लंडविरुद्ध 102 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार खेचत 106 धावा केल्या. हे त्याने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमधील 19 वे शतक ठरले आहे. हे करताना त्याने मार्क वॉ यांच्या 18 शतकांना मागे टाकले. त्यांनी 244 वनडेमध्ये ही कामगिरी केली हेती.
त्याचबरोबर वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक वनडे शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या स्थानावार रिकी पॉंटिंग आहे. त्याने 29 शतके केली आहेत. या सामन्यात वॉर्नरने वनडे क्रिकेटमध्ये 6000 धावांचा टप्पा देखील पार केला. त्याने आतापर्यंत 141 वनडे सामन्यात 44.83च्या सरासरीने 6007 धावा केल्या आहेत.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) खेळला गेलेला हा सामना पावसामुळे 48 षटकांचा करण्यात आला. या मालिकेच्या पहिल्या दोन्ही सामन्यात स्टीव्ह स्मिथ याने चांगली खेळी केली होती. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 80 आणि दुसऱ्या सामन्यात 94 धावा केल्या होत्या, मात्र तिसऱ्या सामन्यात तो 21 धावा करतच बाद झाला. तसेच वनडेमध्ये त्याने 12 शतके केली आहेत. त्याशिवाय ऍरॉन फिंच 17 आणि ऍडम गिलक्रिस्ट याने 16 शतके केली. तसेच मॅथ्यू हेडन यानेही 10 शतके केली असून यांच्याशिवाय एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज वनडेमध्ये 10 पेक्षा अधिक शतके करू शकला नाही. After 1043 days, David Warner’s record century became the most ODI centuries scored by an Australian…
A 19th ODI century for David Warner 👏
Watch the #AUSvENG ODI series LIVE on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺
📝 Scorecard: https://t.co/cxLsbFvL8V pic.twitter.com/E5VxmNbb1T
— ICC (@ICC) November 22, 2022
वॉर्नरबरोबरच या सामन्यात ट्रेविस हेड यानेही 152 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 269 धावांची भागीदारी केली. जी एमसीजीवरील पुरूष वनडे क्रिकेट संघाची सर्वोच्च भागीदारी ठरली.
ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक वनडे शतके (पुरूष खेळाडू)-
29 – रिकी पाँटिंग
19 – डेविड वॉर्नर
18 – मार्क वॉ
17 – ऍरॉन फिंच
16 – ऍडम गिलख्रिस्ट
12 – स्टीव्ह स्मिथ
10 – मॅथ्यू हेडन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडने काढले पाकिस्तानचे वाभाडे! कसोटी मालिकेसाठी ‘पर्सनल शेफ’ला घेऊन जाणार सोबत
विराट कोहलीचा जबरा फॅन किवी ओपनर! म्हणाला, ‘सूर्यासारखा फलंदाज…’