भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या वादळी खेळीचे चाहते केवळ सामान्य जनताच नाही तर खेळाडूही होत आहेत. काही दिवसांपूर्वी टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 चेंडूत 42 धावा करणाऱ्या फिन ऍलन हा पण एक त्यातलाच आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर असलेल्या ऍलनने भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्याबाबत आश्चर्यकारक विधान केले आहे. सूर्यकुमारची फलंदाजी पाहून चांगले वाटते. तो ज्याप्रकरचे शॉट्स खेळतो, ते अप्रतिम असतात. तसेच ऍलन हा विराटचाही चाहता आहे.
विराट कोहली (Virat Kohli) न्यूझीलंडच्या दौऱ्यात नाही, त्याला विश्रांती देण्यात आली आहे. तो 2022च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तो काही काळाआधी फॉर्ममध्ये नव्हता. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबाबत फिन ऍलन (Finn Allen) याने माध्यमांशी बोलताना म्हटले, “विराट कोहली काही काळासाठी फॉर्ममध्ये नव्हता, मात्र जसे त्याने पुनरागमन केले ते खूपच उत्तम राहिले. सध्या पाहिले तर तो सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याने विश्वचषकात संघासाठी सर्वाधिक धावा केल्या, जे कौतुकास्पद होते.”
ऍलनने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचेही कौतुक केले. सूर्यकुमारने न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली. त्यावेळी त्याने मारलेल्या शॉट्सने मी चकीत झालो होतो, असे ऍलनचे म्हणणे होते. पुढे तो म्हणाला, “मला खरंच सूर्यकुमारची फलंदाजी पाहायला आवडते. तो जगातील क्रमांक एकाच फलंदाज असून त्याची बॅटिंगल जबरदस्त असते. तो काही शॉट्स असे खेळतो, जो जगात कोणच खेळू शकत नाही. मला त्याच्यासारखे शॉट्स खेळायला आवडतील.”
ऍलन सुरू असलेल्या टी20 मालिकेत अपेक्षेप्रमाणे खेळला नाही. त्याने टी20 विश्वचषकात मात्र चांगली सुरूवात केली होती. ज्यामध्ये सातत्य राखण्यात त्याला अपयश आले. तो भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. Big fan of Virat Kohli Kiwi opener finn allen said, Would like to be a batsman like Suryakumar Yadav
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिले देश, नंतर लीग! इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूची बीबीएलमधून माघार
सूर्या भारताकडून खेळणार हे रोहितला 11 वर्षांपूर्वीच समजलेलं! ‘हिटमॅन’चं ‘ते’ ट्वीट व्हायरल