पुणे (19 मार्च 2024) -प्रमोशन फेरीतील दुसरा सामना रत्नागिरी विरुद्ध कोल्हापूर यांच्यात झाला. रत्नागिरी संघ ‘अ’ गटात तिसऱ्या स्थानावर राहिला होता तर कोल्हापूर संघ ‘ब’ गटात पहिल्या क्रमांकावर राहिला होता. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघानी सावध खेळ केला. सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटाच्या खेळात कधी रत्नागिरी संघ 1 गुणांच्या आघाडीवर तर कधी कोल्हापूर संघ 1 गुणांच्या आघाडीवर होता. मात्र त्यानंतर अभिषेक शिंदे ने चढाईत गुण मिळवत रत्नागिरी संघाला आघाडी मिळवून दिली.
रत्नागिरीच्या निलेश शिंदे व श्रीपाद कुंभारच्या भक्कम बचावाने कोल्हापूर संघाला ऑल आऊट करत मध्यांतरा पर्यत 17-11 अशी आघाडी मिळवली. मध्यंतरा नंतर सौरभ फगारे व बचावपटूंनी जोरदार खेळ करत रत्नागिरी संघाला ऑल करत पिछाडी कमी करत 18-20 अशी केली. शेवटची 10 मिनिटे शिल्लक असताना कोल्हापूर संघाने 2 गुणांची आघाडी घेतली होती. दोन्ही संघ तिसऱ्या चढाईवर खेळण्याचा प्रयत्न करत होते.
कोल्हापूर ने आक्रमक खेळ करत शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना रत्नागिरी संघाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत 28-22 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर सौरभ फगारे ने 4 गुणांची सुपर रेड करत कोल्हापूर संघाचा विजय जवळपास निश्चित केला. कोल्हापूर संघाने 34-27 असा विजय मिळवला.कोल्हापूरच्या सौरभ फगारे ने सुपर टेन पूर्ण करत एकूण 11 गुण मिळवले. तर ओमकार पाटील ने सुद्धा महत्वपूर्ण 8 गुण मिळवत आपली भूमिका निभावली. तर बचावपटू दादासो पुजारीने पकडीत एकूण 5 गुण मिळवले.
बेस्ट रेडर- सौरभ फगारे, कोल्हापूर
बेस्ट डिफेंडर- दादासो पुजारी, कोल्हापूर
कबड्डी का कमाल – सौरभ फगारे, कोल्हापूर
महत्वाच्या बातम्या –
स्वतः अश्विनला नाही मिळालं सीएसकेच्या मॅचचं तिकिट! फिरकीपटूने सोशल मीडियावर व्यक्त केली खंत
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे 5 गोलंदाज कोण, अनेक दिग्गजांचाही समावेश; जाणून घ्या