रविचंद्रन अश्विन इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. पण अनेक वर्ष त्याने पाच वेळची आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले आहे. आगामी हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. पण अश्विनला या सामन्यासाठी अद्याप तिकिट मिळू शकले नाही.
आयपीएल 2024 (IPL 2024)चा पहिला सामना एमएस धोनी याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला जाणार आहे. 22 मार्च रोजी आयपीएल हंगामाची सुरुवात होणार असून चेन्नईत सीएसके आणि आरसीबी (CSK vs RCB) आमने सामने असेल. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याचे हे होम ग्राउंड आहे. अनेक वर्ष सीएसकेसाठी खेळणाऱ्या अश्विन आणि त्याच्या कुटुंबाला हा सामना पाहायचा आहे. पण सीएसके आणि आरसीबीच्या चाहत्यांमध्ये या सामन्याचे तिकिट मिळवण्यासाठी चढाओढ एवढी आहे की, अश्विनला देखील अद्याप तिकिट मिळाले नाहीये. अशात अश्विनने सोशल मीडिया प्लॅटफॉरम एक्स (X) वरून सीएसकेकडे तिकिटांची मागणी केली.
आयपीएलच्या बातम्यांसाठी आताच व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!- इथे क्लिक करा
अश्विनने समोवारी (18 मार्च) दुपरी एक्सवर पोस्ट करत सीएसकेकडे तिकिटाची मागणी केली. त्याने या पोस्टमध्ये लिहिले की, “सीएसके विरुद्ध आरसीबी सामन्यासाठी तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. माझ्या मुलींनाही आयपीएलची ओपनिंग सेरेमनी आणि पहिला सामना पाहायचा आहे. सीएसके कृपया मदत करा.” अश्विनच्या या पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
Unreal ticket demand for the #CSKvRCB #IPL2024 opener at Chepauk.
My kids want to the see opening ceremony and the game.@ChennaiIPL pls help🥳— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) March 18, 2024
अश्विन आगामी हंगामात आरसीबीसाठी खेळणार आहे. पण कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी तो अद्याप राजस्थान संघाच्या कॅम्पमध्ये सामील झाला नाहीये. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान अश्विनच्या आईला दुखापत झाली होती. याच कारणास्तव फिरकीपटू गोलंदाज आईची काळजी देखील घेत आहे. माहितीनुसार अश्विनची आई घरात घसरून पडली होती. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून अश्विन याच कारणास्तव घरी परतला होता. असे असले तरी, त्याने या मालिकेत सर्वाधिक 26 विकेट्स नावावर केल्या होत्या. (Ravichandran Ashwin did not get the ticket for CSK vs RCB match)
महत्वाच्या बातम्या –
IPL खेळण्यासाठी एनसीएकडून राहुलला हिरवा कंदील, सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पाळावी लागणार ‘ही’ अट
भारतात संधी मिळाली नाही म्हणून ‘हा’ स्टार क्रिकेटपटू इंग्लंडला रवाना, आता तिथे खेळताना दिसणार