आयपीएल 2024 स्पर्धेचं रणशिंग फुंकलं असून जेतेपदासाठी पुढचे दोन महिने दहा संघ भिडणार आहेत. असं असताना काही संघांना स्पर्धेआधीच दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे आयपीएलच्या 17 व्या पर्वात संघांना फटका बसणार आहे. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघाला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून जे सूर्यकुमार यादव आहे.
याबरोबरच आयपीएलला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होत आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सची पत्रकार परिषद काल झाली. ज्यामध्ये पांड्याने सूर्यकुमार बाबत माहिती दिली होती. तसेच यावेळी त्याच्यासोबत मार्क बाऊचर देखील होता. यावेळी पत्रकारांनी हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी बदलाबाबत आणि रोहित शर्माबाबत प्रश्न विचारले. त्यावेळी या दोघांनी उत्तर देणं टाळलं होतं.
त्यानंतर मुंबई इंडियन्सने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यात दोन मुलं रोहितच्या आगमनाबाबत बोलत आहेत. तसेच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या दोन महिन्यांपासून सलग क्रिकेट खेळत आहे. अशात बीसीसीआयच्या वर्कलोड मॅनेजमेंटनुसार त्याला आरामाची गरज होती. त्यामुळे इतक्या दिवसांपासून रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रुजू झाला नव्हता. भारतीय संघ आयपीएलनंतर टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा या स्पर्धेपूर्वी आराम करत होता. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध असणार आहे.
𝗪𝗢𝗛 𝗔𝗔 𝗚𝗔𝗬𝗔… 𝗥𝗢 𝗔𝗔 𝗚𝗔𝗬𝗔! 🔥#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/TId1LOUgnr
— Mumbai Indians (@mipaltan) March 18, 2024
अशातच मुंबई इंडियन्स संघ IPL 2024 साठी पूर्णपणे तयार आहे. संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा देखील आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवच्या पुनरागमनाची चाहत्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादव अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. नवीन हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने पत्रकार परिषद घेतली होती तेव्हा यावेळी प्रशिक्षकाला सूर्यकुमारच्या पुनरागमनाबद्दल प्रश्न विचारला असता, आम्ही बीसीसीआयच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असे मार्क बाऊचर म्हणाले होते.
आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ – रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन, देवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, विष्णू विनोद, रोमॅरियो शेफर्ड, शम्स शेफर्ड. नेहल वढेरा, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी.
महत्वाच्या बातम्या –