प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं की त्यानं टीम इंडियासाठी जास्तीत जास्त सामने खेळावे. परंतु एवढ्या मोठ्या लोकसंखेच्या देशात प्रत्येक क्रिकेटपटूला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळतेच असं नाही. अशा परिस्थितीत खेळाडूंची कारकीर्द एकतर देशांतर्गत पातळीवरच संपते किंवा खेळाडू संधी मिळण्याच्या प्रयत्नात इतर देशांमध्ये जातात. सध्या असे अनेक देश आहेत जिथे भारतीय वंशाचे खेळाडू क्रिकेट खेळत आहेत.
नुकतीच एक बातमी समोर आली की, टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू आता परदेशात गेला असून तो परदेशी संघाकडून खेळताना दिसणार आहे. सध्या टीम इंडियामध्ये युवा खेळाडूंना संधी दिली जात असून वरिष्ठ खेळाडूंना टीम इंडियातून वगळलं जातंय. दरम्यान, टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटही संघात संधी न मिळाल्यानं इंग्लंडला रवाना झाल्याची बातमी समोर आली आहे.
आता जयदेव उनाडकट काउंटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना दिसेल.
टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटनं 2023 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे. टीम इंडियातून वगळल्यानंतर जयदेव उनाडकट परदेशात गेला आणि त्यानं काउंटी क्रिकेटमध्ये भाग घेतला. जयदेव उनाडकटला 2024 च्या उन्हाळी हंगामासाठी काउंटी क्लब ससेक्सनं करारबद्ध केलं आहे. तो पहिल्यांदाच काउंटी खेळायला जाईल, असं नाही. तो याआधीही अनेकदा काउंटी क्रिकेट खेळला आहे.
जयदेव उनाडकटनं टीम इंडियासाठी पहिला कसोटी सामना 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. त्यानंतर तो जवळपास 12 वर्ष कसोटी संघाबाहेर होता. पण 2022 साली बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत तो परतला आणि त्यानंतर त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यावरही संघात सामील करण्यात आलं. पण उनाडकट आपली छाप सोडू शकला नाही. यानंतर व्यवस्थापनानं त्याला टीमच्या बाहेरचा रस्ता दाखवला.
जर आपण जयदेव उनाडकटच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोललो, तर त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्या कारकिर्दीत त्यानं 114 सामन्यांच्या 197 डावांमध्ये 23.34 च्या सरासरीनं 403 विकेट्स घेतल्या. या कालावधीत त्यानं 23 वेळा एका सामन्यात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये परतणार ‘हा’ श्रीलंकेचा धाकड क्रिकेटपट्टू
IPL सोडा, PSL ची बक्षीस रक्कम तर WPL पेक्षाही कमी! जाणून घ्या चॅम्पियन इस्लामाबादला किती पैसै मिळाले
श्रेयस अय्यरला मिळाली आयपीएल खेळण्याची परवानगी, मात्र ‘या’ खास गोष्टीची घ्यावी लागेल काळजी