केएल राहुल मागच्या दोन आयपीएल हंगामांपासून लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 17 हंगाम 22 मार्च रोजी सुरु होणार आहे. लखनऊचा कर्णधार राहुल या हंगामात खेळणार की नाही, याविषयी सर्वांच्याच मनात संभ्रम होता. पण आता चाहत्यांसह संघ व्यवस्थापनासाठी चांगली बातमी समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार केएल राहुल याला आगामी आयपीएल हंगामात खेळण्याची परवानगी मिळाली. बेंगलोर स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत मागच्या काही दिवसांपासून राहुल दुखापतीवर उपचार आणि सराव करत होता. माहितीनुसार राहुलने फिटनेस मिळवली आहे. पण आयपीएलमध्ये खेळण्याआधी एनसीएकडून त्याला काही सुचना केल्या गेल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात राहुलला ही दुखापत झाली होती.
आयपीएलमध्ये खेळताना जास्त कार्यभार न घेण्याचा सल्ला राहुलला दिला गेला आहे. अशात कर्णधाराने विकेटकिंपिंग करताना न दिसण्याची शक्यता दाट आहे. बीसीसीआयच्या सूत्राकडून अशी माहिती मिळाली आहे की, “एनसीएने राहुलला खेळण्याची परवानगी दिली आहे. तो गुरुवारी (20 मार्च) लखनऊ संघासोबत जोडला जाईल. लखनऊला आपला पहिला सामना 24 मार्च रोजी राजस्थान रॉयल्ससोबत खेळायचा आहे. त्याने सुरुवातीला विकेटकिपिंग न करण्याचा सल्ला दिला गेला आहे. अशात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये राहुल केवळ फलंदाज म्हणून खेळेल.”
राहुलने जरी संघासाठी विकेटकिपिंग केली नाही, तरी लखनऊकडे यासाठी दोन चांगले पर्याय आहेत. दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक आणि वेस्ट इंडीज निकोलस पूरन यांच्यात दोन यष्टीरक्षक संघात आहेत. निकोलस पूरनकडे यावर्षी लखनऊच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देखील सोपवली गेली आहे.
असे असले तरी, राहुलसाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळणे गरजेचे आहे. कारण याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याला आगमी टी-20 विश्वचषकात भारतीय संघाकडून संधी दिली जाणार आहे. यावर्षीचा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये जून महिन्यात सुरू होणार आहे. (Green light from NCA for Rahul to play in IPL, ‘this’ condition will have to be followed in the opening matches)
महत्वाच्या बातम्या –
IPL सोडा, PSL ची बक्षीस रक्कम तर WPL पेक्षाही कमी! जाणून घ्या चॅम्पियन इस्लामाबादला किती पैसै मिळाले
आयपीएलपूर्वी सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का, हा खेळाडू सुरवातीच्या सामन्यातून बाहेर?