पुणे (19 मार्च 2024)- क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आजपासून प्रमोशन फेरीला सुरुवात झाली. ‘अ’ व ‘ब’ गटातील टॉप 4 संघ असे एकूण 8 संघ या फेरीत खेळणार आहेत. 8 ही संघ प्लेऑफस मध्ये खेळणार असून ह्या फेरीतील क्रमवारी महत्वपूर्ण असणार आहे. आजचा पहिला सामना अहमदनगर विरुद्ध नंदुरबार यांच्यात झाला. पहिल्याच चढाईत प्रफुल झवारे ची पकड नंदुरबार संघाने गुण मिळवला तर पुढील चढाईत जयेश महाजन ने गुण मिळवत नंदुरबार संघाला दुसरा गुण मिळवून दिला. अहमदनगरच्या आशिष यादव ने 2 गुण मिळवत सामना 2-2 असा बरोबरीत आणला.
पहिल्या 10 मिनिटात सामना 7-7 असा बरोबरीत होता. त्यानंतर अहमदनगरच्या चढाईटपटूंनी व बचावपटूंनी गुण मिळवत मध्यांतरापुर्वी नंदुरबार संघाला ऑल आऊट करत अहमदनगर संघाने 18-09 अशी आघाडी मिळवत जोरदार पलटवार केला. मध्यंतराला अहमदनगर संघाने 19-11 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतर अहमदनगर संघाने आक्रमक खेळ करत पुन्हा एकदा नंदुरबार संघाला ऑल आऊट केले. प्रफुल झवारे ने सुपर टेन महत्वपूर्ण खेळी केली.
सामन्याची शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना नंदुरबार संघाने अहमदनगर संघाला ऑल आऊट करत 23-33 अशी आपली पिछाडी कमी केली. पुढील चढाईत जयेश महाजन ने 2 गुण मिळवत पिछाडी आणखी कमी केली. मात्र अहमदनगर संघाने सामना अखेर 36-27 असा जिंकला. प्रफुल झवारे ने सामन्यात सर्वाधिक 12 गुण मिळवले तर सौरव मेद ने पकडीत एकूण 4 गुण मिळवले. नंदुरबार कडून वरून खंडले ने चांगला खेळ केला.
बेस्ट रेडर- प्रफुल झवारे, अहमदनगर
बेस्ट डिफेंडर- सौरव मेद, अहमदनगर
कबड्डी का कमाल – वरून खंडले, नंदुरबार
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या 17 व्या हंगामापूर्वी सूर्यकुमार यादव बाबत मोठी बातमी, जाणून व्हाल थक्क
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार खाणारे 5 गोलंदाज कोण, अनेक दिग्गजांचाही समावेश; जाणून घ्या