Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहिले देश, नंतर लीग! इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूची बीबीएलमधून माघार

पहिले देश, नंतर लीग! इंग्लंडच्या 'या' स्टार खेळाडूची बीबीएलमधून माघार

November 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Liam Livingstone Jos Buttler & Ben Stokes

Photo Courtesy: Twitter/ICC


बिग बॅश लीगला (बीबीएल) मंगळवारी (22 नोव्हेंबर) मोठा धक्का बसला. नवा हंगाम काही दिवसांवरच येऊन ठेपला असून मोठ्या खेळाडूने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय व्यस्त वेळापत्रकामुळे बीबीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. हा आहे इंग्लंडचा स्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टोन.

बीबीएलमध्ये लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळणार होता. ऑगस्ट महिन्यात झालेल्या लिलावामध्ये मेलबर्न सर्वात आधी लियामलाच विकत घेतले होते. आता तो बीबीएलच्या 12व्या हंगामात खेळणार नाही हे मेलबर्नने ट्वीट करत अधिकृतपणे जाहीर केले आहे.

The Melbourne Renegades can confirm Liam Livingstone has withdrawn from #BBL12.

Full details 👇

— Melbourne Renegades (@RenegadesBBL) November 22, 2022

लियाम बीबीएलमध्ये पहिला भाग खेळणार होता, कारण त्याला एसए 20 लीगने करारबद्ध केले असून तो दुसऱ्या भागाला मुकणार होता. तसेच त्याला इंग्लंडच्या कसोटी संघात निवडले आहे. इंग्लंड डिसेंबरमध्ये पाकिस्तानचा दौरा करणार आहे. दुसऱ्या भागात लियाम खेळणार नसल्याने मेलबर्नने आधीच आंद्रे रसेल याला चार सामन्यांसाठी करारबद्ध केले. आता लियाम संपूर्ण हंगामच खेळणार नाही हे त्याने जाहीर केले.

इंग्लंडच्या कसोटी संघात लियामला घेतले याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लियामबरोबरच डेविड विले यानेही बीबीएलमधून माघार घेतली आहे. “लियाम आमच्या संघाचा भाग नसल्यामुळे आम्ही नक्कीच निराश आहोत, परंतु आम्हाला त्याचा निर्णय समजतो,” रेनेगेड्सचे सरव्यवस्थापक जेम्स रोजेनगार्टन म्हणाले. Liam Livingstone withdraws from BBL

त्याचबरोबर पर्थ स्कॉर्चरने करारबद्ध केलेला विदेशी खेळाडू लॉरी इवान्स हा डोपिंग चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. यामुळे संघाने त्याचा करार रद्द केला आहे. त्यातच ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल हा पायाच्या दुखापतीमुळे बीबीएलच्या पूर्ण हंगामाला मुकण्याची शक्यता आहे. त्याचा याच महिन्यात एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये पाय मोडला होता. ज्यामुळे तो किमान तीन महिने तरी क्रिकेटपासून दूरच राहणार आहे.

बीबीएल 2022-23च्या हंगामाला 13 डिसेंबरपासून सुरूवात होणार असून अंतिम सामना 4 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान तीन सामन्यांची कसोटी मालिका 1 डिसेंबरपासून ते 21 डिसेंबरपर्यंत खेळली जाणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्ध ‘बर्थ-डे बॉय’ उमरानला मिळणार का संधी? पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
VIDEO: फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराणच्या खेळाडूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार, कारण आले समोर


Next Post
INDvNZ 3rd T20

NZvIND: मालिका निर्णायक टी20 सामन्यात न्यूझीलंडने जिंकला टॉस; दोन्ही संघात बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन

Suryakumar-Yadav-And-Virat-Kohli

विराट कोहलीचा जबरा फॅन किवी ओपनर! म्हणाला, ‘सूर्यासारखा फलंदाज...’

Ben Stokes & Babar Azam

इंग्लंडने काढले पाकिस्तानचे वाभाडे! कसोटी मालिकेसाठी 'पर्सनल शेफ'ला घेऊन जाणार सोबत

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143