---Advertisement---

VIDEO: फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराणच्या खेळाडूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार, कारण आले समोर

Iran Football Team
---Advertisement---

कतार येथे सुरू झालेल्या 22व्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सोमवारी (21 नोव्हेंबर) इंग्लंड आणि इराण या संघांदरम्यान सामना खेळला गेला. ब गटातील या सामन्यात इंग्लंडने इराणचा अक्षरशः धुव्वा उडवत 6-2 असा दणदणीत विजय मिळवला, मात्र हा सामना इंग्लंडच्या नाहीतर इराणच्या खेळाडूंमुळे चर्चेत आला. कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सामन्याआधी राष्ट्रगीत म्हटले जाते. या सामन्यातही तसेच झाले, मात्र इराणच्या खेळाडूंनी राष्ट्रगीत म्हणण्यास साफ नकार दिला. यामुळे चर्चा सुरू झाल्या असून इराणचा कर्णधार एहसान हजसाफी याने त्याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.

इराणचा पूर्ण संघ देशाच्या सरकार विरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाचे समर्थन करत असून त्यासाठीच हे पाऊल उचलले गेले, असे समोर येत आहे. “सामन्याआधी आम्ही सर्वानी आधीच ठरवले होते की राष्ट्रगीत म्हणणार नाही,” असे इराणच्या एका खेळाडूने म्हटले

इंग्लंड विरुद्ध इराण सामन्याआधी जेव्हा खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर इराणचे राष्ट्रगीत वाजवले गेले तेव्हा इराणच्या 11 खेळाडूंच्या चेहऱ्यावर गंभीर हावभाव दिसत होते. तेव्हा ते खेळाडू भावूकही होताना दिसले.

झाले असे की, इराणमध्ये 16 सप्टेंबरला पोलिस कोठडीत असलेल्या 22 वर्षाच्या महसा अमिनी हिचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच सरकार विरोधाच्या आंदोलनाला सुरूवात झाली. अमिनीला तेहरानमध्ये अटक केली होती. त्यानंतर तीन दिवसांतच तिचा मृत्यू झाला. अमिनीवर इराणच्या ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. इराणमध्ये हिजाब घालणे बधंनकारक आहे.

या संपूर्ण प्रकरणाने इराण चांगलेच पेटले असून खेळाडूंनीही विश्वचषकात राष्ट्रीगीत न म्हणण्याचा आणि जिंकल्यावर जल्लोष न करण्याचा निर्धार केला आहे. यामुळे इराणच्या खेळाडूंवर टिकाही झाली असून त्याचे कारण कर्णधाराने स्पष्ट केले आहे.

एहसान हजसाफी (Ehsan Hajsafi) म्हणाला, “फुटबॉल संघाच्या कर्णधाराने शासनाचा अवमान केला, निषेधाचे समर्थन केले: “आपल्या देशातील परिस्थिती योग्य नाही आणि आपले लोक आनंदी नाहीत हे आपल्याला मान्य करावे लागेल. आपण त्यांच्या सोबत आहोत हे त्यांना कळायला हवे. आणि आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आणि परिस्थितीबद्दल आम्ही त्यांच्याशी सहानुभूती व्यक्त करतो. ”

या सामन्यात पूर्ण वेळेनंतर इंग्लंडने 6-2 असा विजय मिळवत विजयी सलामी दिली. इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम याची उपस्थिती या सामन्यासाठी लाभली होती. FIFA WC 2022: Iran players refuse to sing national anthem before match against England, know why

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल गाजवणारे उमरान मलिक आणि संजू सॅमसन खेळणार का तिसरा टी20 सामना? हार्दिकने दिले स्पष्टीकरण
सूर्या भारताकडून खेळणार हे रोहितला 11 वर्षांपूर्वीच समजलेलं! ‘हिटमॅन’चं ‘ते’ ट्वीट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---