Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

न्यूझीलंडविरुद्ध ‘बर्थ-डे बॉय’ उमरानला मिळणार का संधी? पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

न्यूझीलंडविरुद्ध 'बर्थ-डे बॉय' उमरानला मिळणार का संधी? पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

November 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Umran-Malik-Hardik-Pandya

Photo Courtesy: twitter/BCCI


न्यूझीलंड विरुद्ध भारत मंगळवारी (22 नोव्हेंबर) तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. हा सामना नेपियर येथे खेळला जाणार आहे, जो चांगलाच थरारक होण्याची शक्यता आहे. हा सामना जिंकत भारताला मालिका जिंकण्याचा आणि न्यूझीलंडला मालिका बरोबरीत राखण्याची संधी आहे. यामुळे हा सामना जिंकण्याचा दोन्ही संघाचा हेतू असणार आहे. या अतिमहत्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन कशी असेल ते पाहू.

भारताच्या संघात बदल होण्याची तेवढी शक्यता नाही, मात्र कर्णधार हार्दिक पंड्या आणि संघ व्यवस्थापक दोन खेळाडूंना आराम देऊ शकतात. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार किंवा अर्शदीप सिंग यांचा समावेश असू शकतो. यांना विश्रांती दिली तर त्यांच्याजागी अंतिम अकरामध्ये उमरान मलिक आणि संजू सॅमसन यांना संधी मिळू शकते. तसेच रिषभ पंत याच्याकडे चांगली कामगिरी करण्याची शेवटची संधीही असू शकते.

न्यूझीलंडचा संघ पाहिला तर कर्णधार केन विल्यमसन खेळणार नाही हे आधीच जाहीर झाले आहे. त्याच्याजागी मार्क चॅपमन संघात सामील झाला तर टीम साऊदी नेतृत्व करणार आहे. अशात संघ व्यवस्थापक मायकल ब्रेसवेल याला अंतिम अकरामध्ये घेऊ शकते. मालिका निर्णायकाच्या सामन्यात किवी संघात हे बदल असतील. Will Umran Malik get a chance against New Zealand? Here’s a look at the possible playing elevens for both the teams NZvIND T20

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

भारताची संभाव्य इलेव्हन: रिषभ पंत, इशान किशन, सूर्यकुमार यादव/संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग/उमरान मलिक, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंडची संभाव्य इलेव्हन: फिन ऍलन, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन/मायकेल ब्रेसवेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ऍडम मिल्ने, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराणच्या खेळाडूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार, कारण आले समोर
आयपीएल गाजवणारे उमरान मलिक आणि संजू सॅमसन खेळणार का तिसरा टी20 सामना? हार्दिकने दिले स्पष्टीकरण


Next Post
Liam Livingstone Jos Buttler & Ben Stokes

पहिले देश, नंतर लीग! इंग्लंडच्या 'या' स्टार खेळाडूची बीबीएलमधून माघार

INDvNZ 3rd T20

NZvIND: मालिका निर्णायक टी20 सामन्यात न्यूझीलंडने जिंकला टॉस; दोन्ही संघात बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन

Suryakumar-Yadav-And-Virat-Kohli

विराट कोहलीचा जबरा फॅन किवी ओपनर! म्हणाला, ‘सूर्यासारखा फलंदाज...’

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143