Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

NZvIND: मालिका निर्णायक टी20 सामन्यात न्यूझीलंडने जिंकला टॉस; दोन्ही संघात बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन

NZvIND: मालिका निर्णायक टी20 सामन्यात न्यूझीलंडने जिंकला टॉस; दोन्ही संघात बदल, पाहा प्लेइंग इलेव्हन

November 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
INDvNZ 3rd T20

Photo Courtesy: Twitter/ BCCI


न्यूझीलंड विरुद्ध भारत (NzvIND) यांच्यात मंगळवारी (22 नोव्हेंबर) मालिका निर्णायक टी20 सामना खेळला जाणार आहे. नेपियरमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या नाणेफेकीला पावसामुळे उशिर झाला होता. नाणेफेक आता झाली असून यजमान संघाने त्यामध्ये बाजी मारत भारताला प्रथम गोलंदाजी करण्यास सांगितले. या सामन्यासाठी दोन्ही संघाच्या अंतिम अकरामध्ये बदल दिसला आहे.

भारताच्या संघात एक बदल झाला आहे. वॉशिंग्टन सुंदर याला बाकावर बसवले असून त्याच्याजागी हर्षल पटेल याला अंतिम अकरामध्ये स्थान दिले आहे. तसेच न्यूझीलंडने आधीच जाहीर केले होते की, नियमित कर्णधार केन विल्यमसन पूर्वनियोजित वैद्यकीय भेटीमुळे या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याजागी या सामन्यात टीम साउदी नेतृत्व करणार आहे, तर अंतिम अकरामध्ये मार्क चॅपमन याला संधी देण्यात आली आहे.

या सामन्यात तरी संजू सॅमसन याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तो बाकावरच आहे. त्याचबरोबर उमरान मलिक, शुबमन गिल, कुलदीप यादव, सुंदर हे पण अंतिम अकरामध्ये नाही.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन-
भारत-: इशान किशन, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल

Playing XI update 🚨

One change for #TeamIndia as Harshal Patel comes in place of Washington Sundar

Follow the match 👉 https://t.co/rUlivZ2sj9 pic.twitter.com/CneSI2LLK5

— BCCI (@BCCI) November 22, 2022

न्यूझीलंड -: फिन ऍलन, डेवॉन कॉनवे (विकेटकीपर), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ऍडम मिल्ने, इश सोधी, टिम साउदी (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन

A toss win in Napier and we’re batting first in T20 3! 🏏

Follow play LIVE on @sparknzsport or @TodayFM_nz in NZ and with @PrimeVideoIN in India. LIVE scoring https://t.co/VBcIAioDW1 #NZvIND #CricketNation pic.twitter.com/MAahnuroJm

— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 22, 2022

या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना भारताने 65 धावांनी जिंकला. त्यामुळे तीन सामन्यांच्या या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखालील भारत 1-0 अशा आघाडीवर आहे. तसेच मालिका जिंकण्याचा भारताचा तर बरोबरी राखण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल. पाऊस अजूनही सुरूच असून सामन्याला आणखी उशिर होण्याची शक्यता आहे. New Zealand Won The Toss in 3rd T20 vs India

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिले देश, नंतर लीग! इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूची बीबीएलमधून माघार
सलामत रहे दोस्ताना हमारा! विराट कोहलीने धोनीच्या आठवणीत केला ‘हा’ फोटो शेअर


Next Post
Suryakumar-Yadav-And-Virat-Kohli

विराट कोहलीचा जबरा फॅन किवी ओपनर! म्हणाला, ‘सूर्यासारखा फलंदाज...’

Ben Stokes & Babar Azam

इंग्लंडने काढले पाकिस्तानचे वाभाडे! कसोटी मालिकेसाठी 'पर्सनल शेफ'ला घेऊन जाणार सोबत

Ind-vs-Nz

अर्शदीप अन् सिराजपुढे किवी फलंदाजांनी टाकल्या नांग्या, मालिका जिंकण्यासाठी भारतापुढे 161 धावांचे आव्हान

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143