Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सलामत रहे दोस्ताना हमारा! विराट कोहलीने धोनीच्या आठवणीत केला ‘हा’ फोटो शेअर

सलामत रहे दोस्ताना हमारा! विराट कोहलीने धोनीच्या आठवणीत केला 'हा' फोटो शेअर

November 22, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Dhoni and Kohli

Photo Courtesy-Twitter/imVkohli


महेंद्र सिंग धोनी याचा चाहतावर्ग संपूर्ण जगभर पसरला आहे. या सर्व चाहत्यांमध्ये विराट कोहली याला त्याचा नंबर-1 चाहता समजले जाते. विराटने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात धोनीच्या नेतृत्वात केलेली. धोनीने नेहमी या फलंदाजीची पाठराखण केली आणि कर्णधारपदासाठी त्याची मनधरणीही केली. धोनीच्या याच आठवणींना विराटने उजाळा दिला आहे. विराटने आपल्या सोशल मिडीयावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याला प्रत्येक ठिकाणी धोनीच दिसत असल्याचे त्याने म्हटले आहे.

महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh dhoni) याने आपल्या कारकीर्दीचा शेवट विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली केला होता. विराट म्हणायचा की धोनी त्याच्यासाठी नेहमी कर्णधार राहील. टी20 विश्वचषक संपल्यानंतर विश्रांती घेत असणाऱ्या विराटने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये धोनीचा उल्लेख असून चाहते यावर प्रचंड खुश झाले.

विराटने एका पाण्याच्या बाटलीचा फोटो पोस्ट केला आहे, ज्यावर धोनीचे चित्र आहे आणि सोबतच विराटने असे लिहिले आहे की,”तो सगळीकडे आहे, एवढच नव्हे तर पाण्याच्या बाटलीवर देखील धोनी आहेे.” विराटचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला. या फोटोखाली चाहत्यांनी वगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने धोनीला भगवान 2.0 म्हटले आहे, तर दुसऱ्याने विराटला धोनीचा नंंबर-1 चाहता असे म्हटले आहे.

धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2019च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत खेळला होता. या सामन्यात भारताला न्यूझीलंडच्या हातून पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर धोनीने क्रिकेटमधून थोड्या काळासाठी विश्रांती घेेतली. त्यानंतर कोरोनाच्या संसर्गामुळे क्रिकेटवरच ब्रेक लागला. आयपीएलच्या आधी 15 ऑगस्ट 2020ला धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. धोनी अजून देखील आयपीएलमध्ये खेळत असून तो चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा कर्णधार देखील आहे.(Virat kohli has shared a photo on instagram in which sketch of MS Dhoni is printed on water bottle)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉलिवूड अभिनेत्रीची श्रेयस अय्यरला खास ‘ऑफर’, म्हणाली, ‘माझ्यासोबत कॉफी पिला असता, तर…’
टाटा महा ओपन 14 वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत आदिती सागवेकर, सृष्टी सूर्यवंशी, मिशिका तायडे यांची आगेकूच


Next Post
Rohit-Sharma-And-Suryakumar-Yadav

सूर्या भारताकडून खेळणार हे रोहितला 11 वर्षांपूर्वीच समजलेलं! 'हिटमॅन'चं 'ते' ट्वीट व्हायरल

Umran Malik and sanju samson

आयपीएल गाजवणारे उमरान मलिक आणि संजू सॅमसन खेळणार का तिसरा टी20 सामना? हार्दिकने दिले स्पष्टीकरण

Iran Football Team

VIDEO: फिफा वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी इराणच्या खेळाडूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार, कारण आले समोर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143