भारताने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा 151 धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. यासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाकडून झालेल्या या लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लिश संघावर बरीच टीका होत आहे. त्यामुळे आता पुढील सामना जिंकण्यासाठी इंग्लंड संघ मोठा डाव खेळणार असल्याची चर्चा आहे.
हेडिंग्ले येथे खेळल्या जाणाऱ्या या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी, इंग्लंड संघ टी-20 चा आघाडीचा फलंदाज डेविड मलानला कसोटी संघात स्थान देऊ शकतो. आतापर्यंत या कसोटी मालिकेत इंग्लंड संघाचे दोन्ही सलामीवीर, रॉरी बर्न्स आणि डोमिनिक सिबली चांगली कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना बाकावर बसवत रूट मलानला खेळवू शकतो. त्यामुळे आता जो रूट तिसऱ्या कसोटीत बदललेल्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतो अशी चिन्हे दिसत आहेत.
इंग्लिश दैनिकात प्रसारित झालेल्या बातमीनुसार, रोरी बर्न्स आणि डोम सिबली यांना तिसऱ्या कसोटीतून वगळण्याची दाट शक्यता आहे. तर हसीब हमीद सलामीला येऊ शकतो. याशिवाय प्लेइंग इलेव्हनमध्ये तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड मलानला फलंदाजीसाठी आणण्याची योजना आखली जात आहे.
मलान टी20 विश्वक्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याने 30 टी20 सामने खेळले असून 43 च्या सरासरीने 1123 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि अकरा अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 15 कसोटी सामने खेळले असून 27.85 च्या सरासरीने 724 धावा केल्या आहेत.
पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ते मालिकेत 0-1 ने मागे पडले आहेत. अशात आता कोणत्याही प्रकारे या मालिकेत पुनरागमन करण्याचे त्यांचे प्रयत्न असतील. तथापि, जर मलानला अचानक कसोटी संघासाठी बोलावणे आले तर तो 3 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला कसे अनुकूल करतो? हे पाहणे देखील उत्सुकतेचे असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
नव्या कसोटी क्रमवारीत रूटची बल्लेबल्ले, तर भारतीय खेळाडूंना…
‘मियाँ मॅजिक’पुढे इंग्लंडची पळता भुई थोडी, थरारक विजयानंतर कडक नाचला; व्हिडिओ तुफान व्हायरल
वडिलांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर अचानक सकाळी सकाळी विराट पुन्हा संघात दाखल झाला