---Advertisement---

मोदींनी शब्द पाळला!! नीरज चोप्रासोबत चुरमाचा, तर पीव्ही सिंधूबरोबर घेतला आईस्क्रीमचा आस्वाद

On: बुधवार, ऑगस्ट 18, 2021 3:32 PM
---Advertisement---

टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. या स्पर्धेत भारताला ७ पदक जिंकण्यात यश आले. घवघवीत यश मिळवल्यानंतर संपूर्ण देशभरातून या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील खेळाडूंची भेट घेतली. तसेच गोल्डन बॉय नीरज चोप्रासोबत चुरमाचा देखील आस्वाद घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवलेल्या खेळाडूंची भेट घेतली, तसेच त्यांच्यासोबत चर्चा देखील केली.

यापूर्वी त्यांनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या खेळाडूंचे कौतुक करत म्हटले होते की, “ऑलिम्पिक स्पर्धेत आपले नाव उंचावणारी युवा पिढी, आपले ॲथलिट, आपले खेळाडू या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. काही इथे आहेत, तर काही आपल्या समोर बसले आहेत. आज, मी देशवासियांना सांगतो, जे इथे उपस्थित आहेत आणि जे भारताच्या कानाकोपऱ्यातून या समारंभाला उपस्थित आहेत. त्यांनी या खेळाडूंचा टाळ्या वाजवून सन्मान करा.”

नीरजसोबत घेतला चुरमाचा आस्वाद 
भारताकडून नीरज चोप्राने भालाफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवले होते. १०० वर्षांच्या प्रतिक्षेला अखेर पूर्णविराम देत त्याने ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये भारताला पदक मिळवून दिले होते. अंतिम फेरीत त्याने ८७.५८ मीटर लांब भाला फेकून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. हे पदक त्याने दिवंगत मिल्खा सिंग यांना समर्पित केले होते. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देखील नीरजचे कौतुक करत त्याच्यासोबत संवाद साधला. तसेच त्यांनी नीरज सोबत चुरमाचा आस्वाद देखील घेतला होता.(Narendra Modi eats churma with neeraj Chopra and ice cream with pv sindhu)

 

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला आश्वासन दिले होते की, ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवल्यानंतर ते पीव्ही सिंधू सोबत आईस्क्रीमचा आस्वाद घेतील. यामुळेच मोदींनी आपले आश्वासन पूर्ण करत पीव्ही सिंधूसोबत आईस्क्रीमचा आस्वाद घेतला.

पीव्ही सिंधू ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी दुसरी भारतीय आणि पहिली महिला खेळाडू ठरली. तसेच टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत कुस्तीपटू रवी दहिया आणि बजरंग पूनिया यांनी देखील पदक जिंकले होते. त्यांच्यासोबत देखील नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

महत्त्वाच्या बातम्या – 

लॉर्ड्स कसोटीचा पराभव इंग्लंडच्या जिव्हारी, तिसऱ्या सामन्यासाठी ‘या’ विस्फोटक फलंदाजांला बोलावणार!

नव्या कसोटी क्रमवारीत रूटची बल्लेबल्ले, तर भारतीय खेळाडूंना…

‘मियाँ मॅजिक’पुढे इंग्लंडची पळता भुई थोडी, थरारक विजयानंतर कडक नाचला; व्हिडिओ तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---