---Advertisement---

संधीचं सोनं! तीन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करत मलानचे झुंजार अर्धशतक, त्याचा आनंद तर पाहा

On: गुरूवार, ऑगस्ट 26, 2021 8:50 PM
---Advertisement---

लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी (२५ ऑगस्ट) इंग्लंडच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली करत भारतीय संघाचा डाव ७८ धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (२६ ऑगस्ट) इंग्लडच्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी करत भारतीय संघाला पूर्णपणे बॅकफूटवर टाकले आहे. दरम्यान डेविड मलानने अर्धशतक झळकावल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केले आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी देखील इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना अडचणीत टाकले होते. पहिल्या दिवशी हसीब हमीद आणि रॉरी बर्न्स यांनी अप्रतिम सुरुवात करून देत शतकी भागीदारी केली होती. परंतु दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाच मोहम्मद शमीने रॉरी बर्न्सला ६१ धावांवर बाद केले. त्यानंतर डेविड मलान फलंदाजी करण्यासाठी आला. मलानने हमीदसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर हमीद देखील बाद होऊन माघारी परतला. पुढे मलानने जो रूटसोबत शतकी भागीदारी केली. यासह अर्धशतक देखील झळकावले.

तर झाले असे की, ८६ वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मलानने थर्डमॅनच्या दिशेने एक धाव खेळण्यासाठी शॉट खेळला. यासह त्याने आपल्या कारकिर्दीतील ७ वे अर्धशतक झळकावले. हे अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने हवेत बॅट उंचावून सेलिब्रेशन केले. हे अर्धशतक पाहून संघ सहकाऱ्यांनी आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. हे अर्धशतक खास असण्याचे कारण असे की, डेविड मालनला २०१८ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती.(Dawid malan celebration after scoring half century, watch video)

https://twitter.com/englandcricket/status/1430894221469253635?s=19

त्याने शेवटचा सामना २०१८ मध्ये भारतीय संघाविरुद्धच खेळला होता. डेविड मालन हा टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याला गेली काही वर्ष कसोटी संघात संधी दिली जात नव्हती. परंतु संधी मिळताच त्याने संधीचे सोने केले आहे. अखेर टी ब्रेकपूर्वी मोहम्मद सिराजने रिषभ पंतच्या हातून ७० धावांवर मलानला झेलबाद केले.

महत्त्वाच्या बातम्या-

ENGvIND, 3rd Test, 2nd Day Live: टी ब्रेकपूर्वी सिराजचा इंग्लंडला तिसरा धक्का, मलान ७० धावांवर झेलबाद; यजमानांकडे २२० धावांची आघाडी

हुश्श! संपला जडेजाचा बळींचा दुष्काळ, ४० गडी बाद झाल्यानंतर…

दिस इज सर जडेजा वे! अर्धशतकवीर हमीदला जडेजाने धाडले तंबूत, रहस्यमयी चेंडूवर केले क्लीन बोल्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---